*युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार*
कोल्हापूर दि.२२ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. समाजोपयोगी उपक्रम अविरत सुरु ठेवत यावर्षीही ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार लाभली. वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेनेच्या वतीने ज्ञान भवन प्रबोधन संचलित अंधशाळेतील मुलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंध मुलांसमवेत केक कापून तो मुलांना भरविला. यावेळी युवासेनेचे अविनाश कामते, मंदार पाटील, कुणाल शिंदे, शिवतेज सावंत, सौरभ कुलकर्णी, दादू शिंदे, कपिल पोवार, शैलेश साळोखे, अभिजित काशीद, अभिजित मंडलिक, तेजस्विनी घाटगे, वल्लरी पटेल आदी उपस्थित होते.
यानंतर पांजरपोळ गोशाळा येथे शिवसेना विभाग राजारामपुरी यांच्यावतीने गोमाता पूजन करण्यात आले व गुरांना चारा वाटप करण्यात आले. यावेळी मंदार तपकिरे, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, अंकुश निपाणीकर आदी उपस्थित होते.
सीपीआर येथे अभ्यागत समिती माजी सदस्यांच्या वतीने गरोदर मातांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.अनिता सैबनवार, डॉ.अजित लोकरे, समितीचे माजी सदस्य सुनील करंबे, कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते.
यानंतर करुणालय येथील बालमित्रांना पीव्हीआर सिनेमागृह येथे छावा चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेनेचे आदर्श जाधव यांनी केले होते. यावेळी बालमित्रांच्या समवेत ऋतुराज क्षीरसागर यांनी केक कापला. सुमारे ५० मुलांनी छावा चित्रपटाचा आनंद लुटला.
सायंकाळी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब, देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, यांच्या उपस्थितीत युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, युवासेना जिल्हा समन्वयक वीरेंद्र मंडलिक, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक अशोक भंडारे, विकी महाडिक, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, सुनील जाधव यांच्यासह विविध समाज, तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.