गद्दारी आणि लबाडीचा के. पी पाटीला़चा ग्रंथ तयार होईल..
– युवक नेते व सहकार बोर्डाचे संचालक अमित बाळासाहेब देसाई
: भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाईं यांचा आमदार आबीटकर यांना पाठींबा
; केपींना भुदरगडात मोठा धक्का
गारगोटी :
माजी आमदार के. पी. पाटील यांनी एका महिन्यात तीन पक्ष बदलले असुन ते गद्दारीवर बोलत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीचे आणि लबाडीचे पाठ लिहायला घेतले तर त्यावर के. पी. पाटील यांचे पुस्तक नाही तर ग्रंथ तयार होईल असा टोला युवक नेते व सहकार बोर्डाचे संचालक अमित बाळासाहेब देसाई यांनी लगावला.
ते गारगोटी येथे भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष प्रा.बाळ देसाई गटाचा मेळाव्या प्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलत होते. माजी सरपंच वृषाली देसाई, कोल्हापूर जिल्हा बँक चे संचालक प्राचार्य अर्जुन आबीटकर प्रमुख उपस्थित होते. भुदरगड तालुका स
देसाई पुढे म्हणाले, वैचारिक आघाडीची विचार असणारी माणसे एकत्र येत असून के. पी. पाटील यांनी केवळ बिद्री तुन चिठ्ठ्या देवून मतदार संघात बेरोजगारीचा तांडा निर्माण केला असुन ते रोजगार काय निर्माण म्हणून विद्यमान आमदारांना प्रश्न करतात हे खरोखरच हास्यास्पद आहे. तुम्ही दहा वर्षांत या मतदार संघात काय दिवे लावले यांचे उत्तर त्यांनी मतदारसंघातील लोकांना द्यावे.
स्वत: बेरोजगारीचा प्रश्न सोडवत नाही आणि आमदार आबीटकर यांनी मंजुर केलेल्या प्रकल्पांना खो घालण्याचे काम मात्र इमानेइतबारे करीत असुन हे सर्व मतदार संघातील जनता जाणुन आहेत.
एकमेव जिल्ह्यातील आमदार असुन त्यांनी एकाच मतदारसंघात तीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले असुन भविष्यातील विकासाचा आराखडा त्यांच्या कडे असुन या सर्व बाबींचा विचार करूनच प्रा. बाळ देसाई प्रेमीनी आबीटकर यांनाच पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळ चे माजी संचालक प्रा. दौलतराव जाधव म्हणाले के. पी. पाटील बश्या बैल असुन त्यांच्या मुळे मतदार संघाची अधोगती होणार आहेत त्यामुळे प्रकाश आबीटकर च या मतदार संघाला दिशा देवू शकतात.
जिल्हा बँकचे संचालक प्राचार्य अर्जुन आबीटकर म्हणाले, प्रा बाळ देसाई, भाई आनंदराव आबीटकर यांचा जुना स्नेहबंध दृढ असुन तोच वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय आम्हाला उत्साह वर्धक आहे.
प्रा.बाळ देसाई म्हणाले, मतदार संघाच्या विकासाचा विचार करून आमदार प्रकाश आबीटकर यांना पाठींबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
यावेळी सदलगे, वीरकुमार पाटील, अनिरूद्ध देसाई आदीची भाषणे झाली. यावेळी कपिल खोराटे, महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, विलासराव बेलेकर, शरद मोरे, संग्राम सावंत, रणधीर शिंदे,अरुणशिंदे, मानसिंग पाटील…. आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………………
के.पीं ना मोठा धक्का…
जेष्ठ नेते प्रा. बाळ देसाई यांना मानणारा भुदरगड तालुक्यात मोठा गट असुन त्यांच्या पाठींब्यामुळे आमदार प्रकाश आबीटकर यांना मोठं बळ मिळाले आहे. प्रा. बाळ देसाई यांच्या पाठींब्याने केपींना मोठा धक्का बसला आहे.
……………………………
फोटो ओळी…. गारगोटी येथे प्रा. बाळ देसाई गटाच्या मेळाव्यात बोलताना सहकार बोर्डाचे संचालक अमित देसाई, प्रा. बाळ देसाई, माजी सरपंच वृषाली देसाई, प्रा. अर्जुन आबीटकर.