नारीशक्तीचा निर्धार, चंद्रदीपच आमदार ; करवीर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडणार !…. पक्ष निरीक्षक शारदा जाधव यांचा विश्वास ; पडळ येथे महायुतीचा दणदणीत मेळावा

Spread the news

नारीशक्तीचा निर्धार, चंद्रदीपच आमदार ; करवीर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडणार !…. पक्ष निरीक्षक शारदा जाधव यांचा विश्वास ; पडळ येथे महायुतीचा दणदणीत मेळावा

आर्थिक दुर्बल घटातील महिलांसाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंमलात आणली, दोन कोटींहून अधिक महिलांना लाभ झाला, विरोधकांनी योजना बंद पाडण्याचे षडयंत्र केले. योजनेला विरोध करणाऱ्या महाआघाडीला महिला निवडणूकी इंगा दाखवून इतिहास घडवणार असा विश्वास पक्ष निरीक्षक शारदा जाधव यांनी दिला.
पडळ ( ता. पन्हाळा ) येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालयात महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या महिला मेळावा त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थांनी कुंभी कारखान्याच्या संचालिका प्रमिला पाटील होत्या. शैलेजादेवी नरके, राजलक्ष्मी नरके, देविका पाटक, डॉ. सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जाधव म्हणाल्या की, जिल्ह्यातील ९३ हजार लाडक्या बहिणींचा निधी घराघरांत पोहचवणाऱ्या, पदावर नसतांना १०० कोटीची विकासकामे करणाऱ्या, सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणजे चंद्रदीप नरके होय, उपेक्षित महिलांना हक्काचे घर मिळवणूक देण्यासाठी, अंगणवाडी मानधन वाढ, विविध योजनाचा लाभ कायम राहण्यासाठी सर्व रणरागिणीने महायुतीच्या उमेदवार चंद्रदीप नरकेंना भरघोस मते देऊन विजयी करा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हात बळकट करा असा संदेश दिला.
कल्पना पाटील म्हणाल्या की, सामान्य महिलांनी दिलेला पाठींबा हा राजकारणात काम करतांना चंद्रदीप नरकेच्या स्मरणात कायम राहिल, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. महिला सक्षमीकरण हा महायुतीचा अजेंडा असून विकासकामात सरस असणाऱ्या चंद्रदीप नरकेंनाच विजयी करा. सुडाचे राजकारण करणाऱ्या व काळ्या काचेच्या गाडीतून फिरणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना महायुतीच्या दिड हजार रुपयांचे महत्त्व वाटत नाही, मात्र महिलांना ही भेट त्याच्या संसारीसाठी आधार बनली आहे. असे सांगितले.
यावेळी शिंदेसेना महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पोवार,अमृता पाटील,निता बाडे यांनी मनोगते व्यक्त केली.धनश्री पाटील, रेखा पाटील व यवलूज जिल्हा परिषद संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!