खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये महिला असुरक्षित
खासदार प्रणिती शिंदे
निगवे दुमाला येथे महिला मेळावा
कोल्हापूर: ‘पंधराशे रुपयांच्या आमिषाला बळी पडण्याइतके वाईट दिवस महाराष्ट्रातील महिलांना आलेले नाहीत. स्वतःवर डोंगराइतके दुःख असतानासुद्धा राहुल पाटील माता-भगिनींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, मुलींच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील या तुमच्या भावाला मतदानाच्या आशीर्वादाची ओवाळणी करून विधानसभेत पाठवा,’ असे आवाहन
खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी तेजस्विनी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार शिंदे म्हणाल्या, महिलांना तुच्छ लेखणाऱ्या 50 खोके वाल्यांच्या सरकारने महिलांचा सन्मान केला नाही निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी लाडकी बहीण आठवली आहे परंतु महाराष्ट्राच्या महिलावर एवढी ही वाईट वेळ आलेली नाही त्यामुळे तुमच्या पंधराशे रुपयांच्या आमिषाला महिला बोलणार नाहीत मतांसाठी विविध आमिषे दाखवणाऱ्या खोकेवाल्यांच्या सरकारने महिला युतीला सुरक्षित ठेवलेले नाही लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजनेचे पैसे येणे बंद झाले आहेत.
राहुल पाटील म्हणाले, ‘दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी आयुष्यभर महिलांचा आदर, सन्मान केला. आज सत्तेवर असलेल्या सरकारच्या काळात माताभगिनी घराबाहेर सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत. तुमचा भाऊ म्हणून मी आपली जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला सुरक्षितता देण्यासाठी अहोरात्र झटत आहे.’ तेजस्विनी पाटील म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीला मत म्हणजे महिलांच्या सुरक्षेला, सन्मानाला मत आहे. दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाशी आपुलकीचे नाते जोपासले होते. त्यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्यासाठी माताभगिनींनी राहुल पाटील यांच्या पाठीशी राहावे.