सत्ता असताना भाजपला प्रॉपर्टी कार्ड देता आली नाहीत* *सतेज पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल* : *शाहूनगरात प्रॉपर्टी कार्ड आदेश वाटप*

Spread the news

*सत्ता असताना भाजपला प्रॉपर्टी कार्ड देता आली नाहीत*
*सतेज पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल* : *शाहूनगरात प्रॉपर्टी कार्ड आदेश वाटप*

कोल्हापुर : गेली अडीच वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यावेळी विरोधकांचे हात कुणी धरले होते, अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शाहूनगर आणि दौलत नगर परिसरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड आदेश वाटप कार्यक्रमावेळी आमदार पाटील बोलत होते.
आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून शाहूनगर आणि दौलत नगर परिसरातील नागरिकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी १४९ नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड आदेश प्रदान करण्यात आले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामे केली असून ही कामे लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीच्या तोंडावर आता विरोधक याठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपला शाहूनगर आणि दौलत नगरचा किल्ला अभेद्य ठेवा. प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आपल्यामुळे आणि माझ्या कार्यकर्त्यांच्यामुळेच मार्गी लागला आहे. यावर आता विरोधक बोलतील. मात्र गेली अडीच वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न का मार्गी लावला नाही असा सवाल त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोवार म्हणाले, शाहूनगर आणि दौलत नगर परिसरातील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड होणार नाही, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. मात्र आमदार सतेज पाटील यांनी ते करुन दाखवले. यावेळी उमेश देशिंगर, सुरेश ढोणुक्षे, अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शशिकांत खोत, संगीता देवेकर, छाया पवार, महेश उत्तुरे, रणजीत मोहिते, सर्जेराव साळुंखे, अनिल घाटगे, विजय सूर्यवंशी, काका पाटील, अनिल देवेकर, भैय्या शेटके, अब्बास माने, उमेश पवार, विलास नलावडे, संजय बल्लापूरकर, महेश कोरवी, प्रशांत डवरी, अमोल देशिंगकर, मंगेश गायकवाड, छोटू घाटगे, महेश सूर्यवंशी उपस्थित होते.

 

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न गंभीर*
मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या होत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची टीका आमदार पाटील यांनी केली. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत, मात्र दुसरीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष आणि घर फोडण्याच काम भाजपने केले. गरिबांना गरीब करण्याचे काम भाजपची मंडळी करत असल्याची टिकाही आमदार पाटील यांनी केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!