पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी*

Spread the news

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती.दोन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर मेरी बेदर मैदानावर गर्दी करत आहेत.
*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा आणि चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण, *आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे बैल (वळू)*,पाच वर्षाची देवणी गाय, साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू,*आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ठरत आहेत.*
*अर्जंनि येथील सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड,* शिवाय रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील ८६०३२ या वाणाच्या उत्पन्नापेक्षाही ज्यादा उत्पन्न देणारा १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरत आहे. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती भीमा कृषी प्रदर्शनात मिळत आहे. व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येत आहेत.

*विधायक नावाचा रेडा खास आकर्षण पाहण्यासाठी लहान मुलांसह लोकांची गर्दी*

*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.गोलू २ रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचे वजन जवळजवळ दीड टन आहे. हा विधायक १४ फूट लांब आणि साडे साडेपाच फूट उंच आहेत्या रेड्याची किंमत २५ करोड रुपये असून प्रतिदिन २० किलो दूध २० किलो फीड आणि ३० किलो चारा आणि भुसा खातो.त्याचे राहणीमान ऋतुमानानुसार असते गर्मीमध्ये त्याला एसी आणि पंख्याची आवश्यकता असते.त्याच्या अंघोळीसाठी खास स्विमिंग पूल पानिपत येथे बांधण्यात आलेला आहे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न बीज प्रक्रियेतून प्राप्त होते. सर्वांनाच बघण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी मिळते.विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक,मेरठ उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी गोलू टू म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरविलेले आहे. २०१९ मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.असा हा विधायक नावाचा रेडा २०२५ च्या भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.*

*चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*

*चायना येथून आणण्यात आलेला कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचे तीन वर्षाचे सुलतान नावाचे चायना झिंग जातीचे बोकड हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.३० किलो वजनाचे हे बोकड असून त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत.त्याची लांबी ५ फूट,उंची १ फूट ८ इंच,आणि शिंगे १ फूट ४ इंच आहे.*

*फुलशेतीची माहिती*

*वाळवे खुर्द येथील शंभर टक्के हेकरासाठी चार लाख रुपये अनुदान रेशीम उद्योगासाठी कोश उद्योगासाठी शासनाकडून दिले जात आहेत दिले जाते या रेशीम कोशसाठी वर्षातून चार बॅचेस निघतात एका बॅचमध्ये १०० किलो कोष निघतो एका किलोचा दर ६०० रुपये असतो हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्यवसाय आहे.याचे मार्गदर्शन मिळत आहे.याचबरोबर ४ किलोचा मुळा हेरले येथील अमोल चौगुले यांचा पावणेसात किलोचा केळीचा घड, तेराशे सात उसाचे पाडगाव येथील वाण अर्जंनि येथील सात किलो मैलोडी जातीचे कलिंगड,६.८०० किलो वजनाचा कोहळा,पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*

*जनावरे आकर्षण*

*भीमा फार्म मधील पांढरे घोडे, पुंगनूर जातीची चार वर्षाची अडीच फूट तीन गाई* *नांदेड येथील अजय विश्वनाथ जाधव यांचा राम आणि रावण नाव असणारे साडेपाच वर्ष असणाते लाल कंधारी वळू खास आकर्षण ठरत आहेत याचबरोबर चेतक सहा वर्षाचा घोडा, बेळगाव येथील सुजित शिवकुमार देशपांडे फार्म मधील मैशी आणि घोडे पंढरपुरी जातीचा रेडा हासेगाव वाडी लातूर येथील पाच वर्षाची देवणी गाय, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू बैल आकर्षण ठरत आहे तो सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे.कोगील बुद्रुक येथील साडेतीन वर्ष वय असलेला सहाफूट उंची असलेल्या सोन्या नावाचा बैल आकर्षण आहे. शिवाय लातूर येथील तीन वर्षे वयाचा सहा फूट उंची असलेला देवणी जातीचा बैल (वळू) आकर्षण ठरत आहे*

या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. ताव मारण्यासाठी नागरिक,शेतकरी कुटुंबासह याठिकाणी गर्दी करत आहेत.शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप आज करण्यात आले.

*कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने भीमा कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलेले प्रोजेक्ट खालीलप्रमाणे*

ऊस उत्पादन वाढीसाठी सुपर केनर्सरी द्वारे ऊस रोप तयार करणे,
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गतसामूहिक शेततळे प्लास्टिक आच्छादन हरितगृह कांदाचाळ रायपनिंग चेंबर शीतगृह पॅक हाऊस शेडनेट हाऊस फलोत्पादन यांत्रिकीकरण,
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड बांधावर फळबाग लागवड गांडूळ युनिट नाडेफ कंपोस्ट युनिट,पौष्टिक तृणधान्य ज्वारी नाचणी राजीगरा बाजरी वरई याच्या आहारातील महत्त्व,वैयक्तिक शेततळे क्षारपड जमीन सुधारणा माती नमुना काढणे,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान,महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.

 

*सहभागी कंपन्या*

विला पंप, पॉप्युलर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट, समृद्धी ट्रॅक्टर अँड मशिनरीजे, लक्ष्मी पंप, टाटा सोलर, तालोड फूड्स,चितळे डेअरी, कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन ,गोविंद मिल्क प्रॉडक्ट, वनिता ऍग्रो केम, जैन इरिगेशन लि, विजय कृषी अवजारे, स्वाती मसाले,बाहुबली प्लास्टिक, डेक्कन फार्म इक्विपमेंट, जीएनपी ऍग्रो केअर सायन्स आदी नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.या कंपन्यांची उत्पादने शेती साहित्य पाहावयास मिळत आहेत.आणि त्यांची खरेदी केली जात आहे.याचबरोबर हळद टाकली काजू तर मिल्कचे पदार्थ कापड लोणची यांची जोरदार विक्री होत आहे शेतकरी वर्ग आवश्यक साहित्य खरेदी करण्याकडे वळला आहे.

*आज झालेली व्याख्याने*

आज २२ फेब्रुवारी रोजी.दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार यांनी बोलताना प्रामुख्याने भुईमूग,सूर्यफूल, सोयाबीन करडई या चार जमीन सुधारित वाणाचा वारे,पीक संरक्षण काढणी व तेल निर्मिती आणि पेंडी वर्गीय खते निर्मिती व वापर याबाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा.
दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, यांनी बोलताना दुर्लक्षित फळझाडे उदा.आवळा,चिंच,जांभूळ, फणस,करवंद,कवठ,कोकम आदी फळांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.आणि अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर
माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील यांनी आपले विचार मांडताना शेतीत काटेकोर अचूक व्यवस्थापन अधिक उत्पादन वाढीसाठी गरजेचे आहे याविषयी उत्पादन घटनेची कारणे व त्यावरील उपाय चित्र पितीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. मातीचे आरोग्य पत्रिका तयार करून पीक नियोजन केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून अधिक उत्पादन मिळते. असे विचार मांडले.

*उद्या रविवारी होणारी व्याख्याने*

२३ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय आसवले, माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर हे किफायतशीर दुग्ध व्यवसाय असा करा यावर विचार मांडणार आहेत.तर डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर.आदी मार्गदर्शन करणार आहेत.

आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळत आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाई, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळत आहेत. आज सायंकाळी प्रदर्शन स्थळी प्रचंड गर्दी लोकांनी शेतकऱ्यांनी केली होती.आता दोन दिवस प्रदर्शन उरले असून शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे. .
या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!