पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा हात, मशाल, तुतारी जोरात, कमळ कोमजणार

Spread the news

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा

हात, मशाल, तुतारी जोरात, कमळ कोमजणार

 

कोल्हापूर

अत्यंत चुरशीने मतदान झालेल्या पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा केल्याचे स्पष्ट झाले. या भागात हात, मशाल आणि तुतारी खाते खोलण्याची चिन्हे आहेत. दोन निवडणुकीत फुललेला कमळ यंदा मात्र कोमजण्याची शक्यता असून धणुष्यबाणाची अवस्था बिकट अंदाज व्यक्त होत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या भागात सभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार-चार दिवस मुक्काम ठोकला. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदार संघात प्रचंड चुरस निर्माण झाली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

कोल्हापूर आणि सोलापूरात झालेल्या दुरंगी लढतीत महाविकास आघाडीचे शाहू महाराज, प्रणिती शिंदे यांना मिळालेला प्रतिसाद पाहता हात बळकट होण्याची चिन्हे आहेत. यामुळे कोल्हापुरात पंचवीस तर सोलापुरात दहा वर्षानंतर काँग्रेसल विजयाचा गुलाल उधळणार असून येथे महायुतीला विजयासाठी प्रचंड झगडावे लागण्याची शक्यता आहे.

हातकणंगले मतदार संघात पहिल्याच दिवसापासून शिवसेनेच्या मशालची चर्चा जोरात होती.  मतदान होईपर्यंत ती कायम राहिली. यामुळे सत्यजित पाटील गुलाल उधळण्याची चिन्हे वाढली आहेत. स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शेवटच्या टप्प्यात मोठी धडक मारली. मुख्यमंत्र्यांनी धैर्यशील माने यांच्यासाठी प्रचंड धावाधाव केली. यामुळे पाटील आणि खोत या दोघातील कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता वाढली आहे. येथे मतविभागणीचा फटका बसल्यास कुणाला तरी लॉटरी लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

महाविकास आघाडीच्या तिकीट वाटप घोळात सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांना प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. याच जोरावर ते विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण खासदार संजय पाटील यांनीही प्रचारात कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले, त्यामुळे ते किमान स्पर्धेत आले. महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील जेवढी जादा मते घेतील, तेवढा विशाल पाटील यांचा तोटा होण्याची शक्यता आहे.

सातारा मतदार संघात भाजपने शेवटच्या क्षणी उदयनराजे यांच्या हातात कमळ दिले. शशीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तुतारी फुंकली. शरद पवारांनी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा केल्याने येथे प्रचंड चुरस निर्माण झाली. तुतारी येथे वाजण्याची शक्यता अधिक आहे. पण, उदयनराजेंची प्रतिमा त्यांना साथ देणार का याची उत्सुकता आहे.

माढा मतदार संघात महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हता. पण, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने तगडा  उमेदवार मिळाला. उत्तम जानकरांची त्यांना साथ मिळाल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले. येथेही तुतारी वाजण्याचा अंदाज आहे.

………..

हात का बदलेगा हालात

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षात काँग्रेसचा हात कमकुवत झाला होता. सातारा, सांगली, कोल्हापुरात लढायला संधी नाही, सोलापुरात यश नाही. यामुळे या भागात काँग्रेसची अवस्था बिकट झाली असताना यंदा मात्र लोकसभेत हात मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!