गोखले कॉलेजमध्ये नवोदितांचे स्वागत
कोल्हापूर
गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती अजितराव मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कॉन्सील सदस्य प्रमोद झावरे, उपप्रचार्य एन. टी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.बी. भुयेकर होते.
प्रारंभी प्रा. एस.ए. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रा. पी.डी. आवटे यांनी संस्था व कॉलेजचा परिचय करून दिला. नवीन कॉलेज जीवनाला शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी करिअरला प्राधान्य द्यावे असे आवाहन पृथ्वी मोरे यांनी केले. माजी विद्यार्थी राममोहन कारंडे, जयदीप पाटील, प्रमोद सावंत, दिपक सावेकर,सुनील ऐतवडेकर, समर कारंडेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बलदेव माचवे यांनी कॉलेजला ग्रंथप्रदान केले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे,पेट्रन कॉन्सिल सदस्य दौलत देसाई, कॉन्सील सदस्य पी.बी. झावरे, उपप्राचार्य पाटील, पर्यवेक्षक एस.एन. मोरे,प्रा. आर.बी. सुतार यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. जे.यू. कुंभार यांनी केले. आभार आर.एस. पाटील यांनी मानले.