कोल्हापूर
व्यंकटेशश्वरा प्रकाशन तर्फे सक्षम अधिकारी,जगात भारी आम्ही कोल्हापुरी पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखक निर्माते दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
देवल क्लब मध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात अध्यक्षस्थानी वेंकटेश्वर प्रकाशनचे संस्थापक संपादक संजय भोसले हे होते.माजी खासदार संजय मंडलिक, सौ मेधा मांजरेकर,प्रा.प्रकाश इनामदार, प्रविण मोहिते, अर्थमुवर्स चे रवींद्र पाटील प्रमुख उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची
सुरवात झाली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.प्रमोद झावरे यांनी केले. प्रा.प्रकाश इनामदार यांनी महेश मांजरेकर, व प्रमुख उपस्थितांचा परिचय करून दिला.संजय मंडलिक यांनी शुभेच्छा दिल्या.महेशजी नी कोल्हापूर हे नाट्य सिनेसृष्टी याचे माहेरघर असून ते पुन्हा फुलावं, बहरावं त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू,त्याचबरोबर पुरस्कारप्राप्त व्यक्तीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यानंतर तीन विशेष सत्कार,सहा सक्षम अधिकारी,आणि नऊ जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशा पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले.सूत्रसंचलन प्रा.प्रमोद झावरे यांनी केले.याप्रसंगी सौ प्रभावती इनामदार,सौ सरिता भोसले,पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे नातेवाईक मित्रमंडळी,पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.