कामाचा आणि बिनकामाचा माणूस ओळखुन मतदारांनी निर्णय घ्यावा…… आमदार प्रकाश आबीटकर वाघापुर, मुदाळ, आदमापूर येथे भव्य प्रचार फेरी

Spread the news

कामाचा आणि बिनकामाचा माणूस ओळखुन मतदारांनी निर्णय घ्यावा…… आमदार प्रकाश आबीटकर
वाघापुर, मुदाळ, आदमापूर येथे भव्य प्रचार फेरी

गारगोटी प्रतिनिधी
माझ्या व के.पी.पाटीलांच्या १० वर्षांच्या कामाची व बिनकामाची तुलना करूनच कामाचा आणि बिनकामाचा आमदार ओळखुन मतदारांनी निर्णय घ्यावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. वाघापूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते,यावेळी वाघापुर सह मुदाळ, आदमापुर येथे प्रचार फेरींना लोकांनाही उदंड प्रतिसाद दिला.

आमदार आबिटकर पुढे म्हणाले की, १० वर्षे मी आमदार आहे, १० वर्षे के. पी.पाटील आमदार होते. आत्ता १० वर्षे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री माझे ऐकतात. कारण मी सत्तेत आहे. के.पी.पाटील १० वर्षे आमदार असतांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे सत्तेत होते. मी आमदार असतांना राज्याची तिजोरी आहे तीच तिजोरी त्यांच्या काळात होती. मग त्यांच्या काळात विकास का झाला नाही. पण माझ्या आमदारकीच्या काळात रस्ते झाले, पाण्याच्या योजना झाल्या, विजेची सोय झाली, मंदिरे झाली, दवाखान्याच्या इमारती बांधल्या, शासकीय इमारती झाल्या, तलाठी कार्यालये झाली, ग्रामपंचायत इमारत झाल्या, सिंचनाच्या सोयी झाल्या.मतदार संघाच्या विकासासाठी जे जे गरजेचं आहे ते ते झालं हे कशामुळे झालं तर लोकांसाठी अहोरात्र झटणारा माझ्या सारखा जनसेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदारामुळे शक्य झालं.या उलट के. पी. पाटलांनी माझं आणि केवळ माझं असं स्वतःच हितच पाहिलं. त्यांनी १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात जे काम करायला पाहिजे होते ते त्यांनी केलं नाही. दुर्दैवाने त्यांना आमदारकीची ताकदच कळली नाही. त्यामुळे कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस ही तुलना जरी केली तरी मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल. जे पोटात आहे ते ओठावर घ्यायचे आणि परखडपणे मांडायचे परिणामांची पर्वा करायची नाही. समाजासाठी मांडायचे व भांडायचे हे करत गेलो त्यामुळे स्वर्गीय आर.आर. पाटीलांना जो उत्कृष्ट संसद पट्टू पुरस्कार मिळाला तोच पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते तुमच्या आमदाराला मिळाला हा पुरस्कार माझा नाही तर राधानगरी मतदारसंघातील तमाम जनतेचा आहे. याबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

बाळूमामा देवस्थान व आदमापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन बाळूमामा तिर्थक्षेत्र विकासासाठी ७०० कोटींचा विकास आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे, पुढील टप्प्यात आपण हा विकास आराखडा मंजूर करतोय त्यामुळे नजिकच्याच काळात बाळूमामा मंदिरसह वाघापूरच्या जोतिर्लिंग देवालयाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे आदमापूर सह परिसरातील वाघापूर, मुदाळ गावांसाठी चांगले रस्ते व इतर दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

जोतिर्लिंग मंदिर समिती, ग्रामपंचायत वाघापूर व ग्रामस्थ यांनी जे जोतिर्लिंग मंदिराचे डिझाइन तयार करून घेतले आहे, त्यामुळे वाघापूर गावचे ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदिराचे बांधकाम हे राज्यातील जी नामवंत मंदिरे आहेत त्याच दर्जाचे हे मंदिर होईल आणि याचे भाग्य मला लाभेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पोवार यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा माध्यमातून मतदार संघातील हजारो भगिनींना या योजनेचा लाभ माझ्या आमदारकीच्या काळात मिळू लागलाय ही गोष्ट नेहमीच माझ्या स्मरणात राहील.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले प्रत्येक निवडणुकीत वेगळे चिन्ह घेऊन वेगळी भूमिका घेणारे के.पी.पाटील हेच खरे महागद्दार आहेत .

प्रारंभी आमदार प्रकाशराव आबिटकर यांची ग्रामस्थांच्या वतीने गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पुरुषांसह महिला व युवकांनी प्रचंड जल्लोष केला. या मिरवणुकीचे जोतिर्लिंग मंदिराजवळ सभेत रूपांतर झाले.

यावेळी दत्ताजीराव उगले, सतपाल आरडे, भाजपचे संतोष बरकाळे यांची भाषणे झाली.

यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे,के डी दाभोळे, सुनीलराव जठार, किशन जठार,अरविंद जठार, संभाजीराव आरडे, बी.एस.जठार, शशिकांत गुजर, राम दबडे, विलास कुंभार, नामदेवराव कांबळे, सुनील शिंदे, तानाजी कांबळे, युवराज आरडे, भाऊसो कांबळे, सागर कांबळे, बाळासो दाभोळे,सागर दाभोळे,राजाराम जठार,दीपक जठार, सर्जेराव जठार,नारायण दाभोळे,लक्ष्मण पडवळे, धोंडिराम गुरव, सचिन गुरव, सुनील पाटील यांसह महिला व युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

चौकट……………….

शक्तीपीठ महामार्ग रद्दच……
‘शक्तीपीठ महामार्ग ‘ करणारा मी आहे तसाच रद्द करणाराही मीच आहेमतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी यासाठी मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग व्हावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता, परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली त्यानुसार हा महामार्ग रद्द करण्याची अधिसुचना काढली. आम्हाला विकास करायचा आहे पण कोणाचेही नुकसान करून तर नाहीच नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोणीही चिंता बाळगण्याची गरज नाही अशी आमदार आबिटकर यांनी ग्वाही दिली.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!