विश्वास पाटील सहकार क्षेत्रातील उत्साही योद्धे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकमार शिंदे यांचे गौरवोद्‌गार आबाजींच्याअमृतमहोत्सवानिमित दिमाखदार सत्कार सोहळा

Spread the news

विश्वास पाटील सहकार क्षेत्रातील उत्साही योद्धे

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकमार शिंदे यांचे गौरवोद्‌गार
आबाजींच्याअमृतमहोत्सवानिमित दिमाखदार सत्कार सोहळा

 

 

  •  

कोल्हापूर :

विश्वास पाटील म्हणजे उत्साहाचा झरा आहे,शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत विश्वास पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वयातही कोणतीही काळजी न करता ते ज्या पद्धतीने अफाट काम करत आहेत ते पाहता विश्वास पाटील म्हणजे उत्साही योद्धाच आहे असे गौरवोद्‌गार माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त रविवारी विश्वास नारायण पाटील अमृतमहोत्सव समितीच्या वतीने शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी, विश्वास पाटील यांचा जीवनपट उलघडणाऱ्या ‘अमृतविश्व’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, सुजित मिनचेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील आदी उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात विश्वास नारायण पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचे अभिनंदन करताना कौतुक ही केले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, विश्वास पाटील यांच्यातील अजूनही काम करण्याची ऊर्मी पाहिल्यानंतर या मातीला सलाम करावा लागेल. आबाजींच्या काही नव संकल्पनामुळे गोकुळचा विकास झाला वासरू संगोपन योजनेमुळे संघाला देशाच्या सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, विश्वास पाटील यांच्यातील उत्साह पाहता ते कधीच
रिटायर होणार नाहीत. त्यांचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती संकल्प आहे, त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहू.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विश्वास पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर ते ७५ वर्षांचे वाटत नाहीत. ‘गोकुळ’च्या यशात त्यांचे योगदान खूप
मोठे आहे. पाटील आणि गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आगामी निवडणूक एकत्र लढवावी जय आणि वीरू यांचीही जोडी यापुढेही कायम राहू दे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, विश्वास पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच कोल्हापूरचा सहकार ताकदवान बनला. केवळ गोकुळ दूध संघच नव्हे तर स्थानिक पातळीवर असलेल्या अनेक संस्थांच्या वाटचालीत त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांना अपेक्षित काम विश्वास पाटील यांनी केले आहे त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे गोकुळ दूध संघाला जिल्ह्यात अतिशय मानाचे स्थान मिळाले आहे. संघाच्या प्रगतीत निश्चितपणे त्यांचा वाटा आहे.

सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले, आगामी काळात दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करत राहू. आयुष्यात शेवटचे काम राहिले असून कचरा प्रकल्प करणार असून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. राजकारणात लोकसेवा करत असताना आपण चंद्रदीप नरके यांचे आजोबा डी सी नरके त्यानंतर त्यांचे काका अरुण नरके आता आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत आणि भविष्यात नक्की यांचे चिरंजीव यांच्यासोबत ही काम करून राजकारणातला आपण धर्मगुरू होणार आहे.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले पाटील यांनी राजकारणात कधीही कोणाला वेगळ्या नजरेने पाहिली नाही त्यांची काम करण्याची पद्धत तरुण पिढीला निश्चितपणे प्रेरणादायी आहे.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक केले. आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रदीप नरके, खासदार विशाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे सर्व संचालक तसेच शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील कुणबी कासारी साखर कारखान्याचे संचालक व दुमाला व परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!