अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

Spread the news

* अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

 

 

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार  यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताहात वाढदिवसाचा केक कापून सविंधान वाचन कार्यक्रम घेण्यात आला…..*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा नाम श्री अजितदादा पवार साहेब* यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 28 जुलै रोजी *पन्हाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आसुर्ले तर्फे पोर्ले ता पन्हाळा जि कोल्हापूर* येथे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून सविंधान वाचन कार्यक्रम *जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर* यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला……

यावेळी बोलताना *बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले की,महाविकास आघाडीने सविंधान विरोधी नॅरेटीव्ह सेट केले आणि जनतेच्या मनात महायुती बाबत संभ्रम निर्माण करताना जर ही लोकं सत्तेत पुन्हां आले तर सविंधान बदलतील म्हणुन याना सत्तेपासून दुर ठेवा असा दुराग्रहीत प्रचाराचा फटका महायुतीला लोकसभेत बसला त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेसाहेब यांच्या सूचनेनुसार अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रमासह लोकप्रिय शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करताना सविंधान वाचन कार्यक्रमाद्वारे जनविश्वास सप्ताहात सर्वसामान्य जनतेत विश्वास निर्माण करण्याचं शिवधनुष्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उचललं पाहीजे…..*

यावेळी *शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष धुमाळ,पन्हाळा तालुकाध्यक्ष दाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निवासराव ढोले,ॲड विजय पाटील उत्रेकर,किरण पाटील,अंगद शेवाळे,विश्वजीत सांळोखे,साहिल मुल्लांणी,संजय मगर,अर्जुन चौगुले, शिवाजी खोत,विठ्ठल पाटील,अर्जुन माने,सर्जेराव सासणे,अरुण पाटील,आनंदा पवार,विनायक कोडोलकर,दत्तात्रय दरेकर,महेश जाधव,विजय जाधव,सदाशिव आरंडे,सचिन शिंदे चरण* यांच्यासह मान्यवर नेतेगण आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते……


Spread the news

You may also like

error: Content is protected !!