कोल्हापूर
जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य “माझे आरोग्य माझा हक्क’ सत्यात उतरवायचे असल्यास आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीच्या अंतर्भाव प्रभावीपणे करावा लागेल, असे प्रतिपादन परिषदेत दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉ. मंगेश जतकर यांनी येथे केले.
होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस् असोसिएशन (होमेसा) ने आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन २०२५’ या परिषदेत “भारतीय आरोग्य सेवेत होमिओपॅथीचा प्रभाती वापर” या विषयावर जतकर बोलत होते. ताराराणी चौक येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टूडंटस् असोसिएशन (होमेसा) ने आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन २०२५’ या परिषदेत डॉ. मंगेश अतकर यांनी मार्गदर्शन केले.रुग्णालयात आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांनी ऑनलाईन पद्धतीने केले
जतकर म्हणाले देशातील पहिला सार्वजनिक होमिओपॅथिक दवाखाना राजर्षी शाहू महाराज यांनी १८९८ मध्ये सुरु करून प्रथम सार्वजनिक आरोग्य सेवेत होमिओपॅथीचा समावेश केला. त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण व उपचारांच्या बाचतीत कोल्हापूर पूर्वीपासूनच आघाडीवर राहिले आहे. अखिल भारतीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना कोल्हापूर येथे करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिली.
होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषदेत राहुल जोशी (मुंबई), रोझारिओ डिसोझा, संतोष रानडे, सपना शहा, श्रेयस पांचाळ, मंदार कुटे, रविकुमार जाधव या डॉक्टर्सनी मार्गदर्शन केले.