महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज वर ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व अध्यक्षपदी बिनविरोध निवडीसह एकतर्फी सत्ता ताब्यात

Spread the news

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज वर ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व

अध्यक्षपदी बिनविरोध निवडीसह एकतर्फी सत्ता ताब्यात

मुंबई ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर च्या द्वैवार्षिक निवडणूकीत आज मुंबई येथे संपूर्ण राज्यातील मतमोजणी पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल ने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच व्यवस्थापन समितिला 10 पैकी 8 जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले.
गव्हर्निंग काऊन्सील च्या 90 पैकी 85 जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले.
वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद‘ माणगावे (सांगली) यांनी 1605 मते मिळवून विरोधी उमेदवार अनिल गचके (482 मते) यांना 1123 मतांनी पराभूत केलेे.
मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करूणाकर शेट्टी यांनी 135 मते मिळवून विरोधी उमेदवार व मुंबई जिल्हा बँकेच्या संचालिका कविता देशमुख (55 मते) यांचा 80 मतांनी पराभव केला.
ललित गांधी यांच्या पॅनेलचे विजयी झालेले अन्य उपाध्यक्ष पुढील प्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्र विभागातुन रमाकांत मालु व दिलीप गुप्ता, उत्तर महाराष्ट्र विभागातुन संजय सोनवणे व सौ. संगीता पाटील, कोकण विभागातुन श्रीकृष्ण परब विजयी झाले.
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत चेंबरच्या 98 वर्षाच्या इतिहासात प्रथमच गेल्या 40 वर्षातील सर्व 11 माजी अध्यक्ष यांचा पुढाकाराने एकता पॅनेल ची स्थापना करून निवडणूक लढवून ललित गांधी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र ललित गांधी यांनी आपल्या कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणार्‍या सर्व माजी अध्यक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या पॅनेलला चारीमुंड्याचीत करून राज्याच्या व्यापार-उद्योगाची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ वर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित करून एकहाती सत्ता काबीज केली.
जोरदार व निर्विवाद विजयानंतर ललित गांधी यांनी राज्यभरातील सभासदांना धन्यवाद दिले व गेल्या दोन वर्षात केलेल्या झंझावती कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय राज्यभरातील महाराष्ट्र चेंबर च्या सभासदांना अर्पण करत असल्याचे सांगितले.
ट्रस्ट बोर्ड चे चेअरमन, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्या बरोबर पॅनेल चे नेतृत्व केले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल प्रभारी जे. के. पाटील यांनी काम पाहीले. निवडणूक समितिवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितिवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरूण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहीले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!