अन.. छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजाळला*

Spread the news

*अन.. छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजाळला*

कोल्हापूर दि.०५ : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील अर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असणारे लाईट बंद पडल्याने गेले काही दिवस पुतळा अंधारामध्ये होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी याची तात्काळ दखल घेत पुतळ्याभोवती असलेली विद्युत रोषणाई तात्काळ बदलायच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील विद्युत रोषणाईच्या कामाची दुरुस्ती करून नवीन दिवे बसविण्यात आले. यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा व परिसर पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या कार्यतत्परतेबाबत नागरिकांमधून समाधान होत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!