*उद्याचा अजितदादांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया…..!*
*राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचे आवाहन*
*मार्केट यार्डमधील “रामकृष्ण हॉल” मध्ये होणार जनसन्मान मेळावा*
*नियोजनासाठी झाली कोल्हापुरात बैठक*
*कोल्हापूर, दि. ९:*
*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार हे रविवारी दि. ११ कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सबंध जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांचा हा दौरा यशस्वी करूया, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसूर्लेकर यांनी केले. जिल्ह्यात इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहर व कागल येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहनही त्यांनी केले.*
*उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत श्री. पाटील- आसुर्लेकर बोलत होते.*
*श्री. पाटील – आसुर्लेकर पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते इचलकरंजी येथे राजाराम स्टेडियममधील इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या “राष्ट्रवादी भवन” या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार आहे. दुपारी बारा वाजता कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील रामकृष्ण हॉलमध्ये “जनसमान मेळाव्या” चे आयोजन केले आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता कागल शहरातील विकासकामांचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे.*
*रक्षाबंधनाच्या भेटीचा वादा….. अजितदादा…..!*
*केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले नामदार अजितदादा पवार हे सबंध महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे अनुदान सरकारकडून रक्षाबंधनाच्या आधीच जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील समस्त लाडक्या बहिनींचे लाडके भाऊ अजितदादा यांचा हा वाद आहे, असेही ते म्हणाले.*
*यावेळी के. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे माजी संचालक आसिफ फरास, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, करवीरचे तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, दक्षिण तालुकाध्यक्ष आप्पासो धनवडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष शिरीष देसाई, हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संभाजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक सुनील कांबळे, पन्हाळा तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ, कागल तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, अभिषेक डोंगळे, पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव संदीप कांबळे आदी प्रमुखांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
…………..
*कोल्हापूर -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा रविवारी दि. ११ कोल्हापूर जिल्हा दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, अनिल साळोखे, नवीद मुश्रीफ व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.*
============