ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) च्या अध्यक्षपदी श्री.बळीराम वराडे, उपाध्यक्षपदी श्री.विनोद कांबोज, सचिव पदी श्री रवी पोतदार , खजिनदारपदी श्री. संजय गांधी यांची निवड जाहीर

Spread the news

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) च्या अध्यक्षपदी श्री.बळीराम वराडे, उपाध्यक्षपदी श्री.विनोद कांबोज,
सचिव पदी श्री रवी पोतदार , खजिनदारपदी श्री. संजय गांधी
यांची निवड जाहीर

 


कोल्हापूर- ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) ची पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली. २०२५ पासून पुढील तीन वर्षाच्या कालावधी करिता अध्यक्षपदी श्री.बळीराम वराडे (ट्रेड विंग्स लि.) याची बिनविरोध निवड करण्यात आली . तर उपाध्यक्षपदी श्री विनोद कांबोज (समित ऍडव्हेंचर) यांची एकमताने निवड करण्यात आली.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर ही जिल्हास्तरीय ट्रॅव्हल व टूर ऑपरेटर यांची रजिस्टर संस्था असून 2025-2028 या कालावधी करिता पदाधिकारी निवड सर्वानुमते झालेली आहे.

  •  

सचिव पदी श्री.रवींद्र पोतदार (गिरीकन ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड) सहसचिव पदी श्री इम्रान मुल्ला, खजिनदार पदावर श्री संजय गांधी (गणेश ट्रॅव्हल एजन्सी) सह खजिनदार श्री नवनाथ सुर्वे) तसेच संचालक पदावर श्री.अमित चौकले (ट्रॅव्हल लिंक)आणि श्री.सचिन सावंत(हर्ष ट्रॅव्हल अँड टूर्स) यांची फेर निवड.
श्री.सतीश दळवी, श्री.नवनाथ सुर्वे व श्री. इम्रान मुल्ला यांची नूतन संचालक पदी निवड झालेली आहे.
श्री बळीराम वराडे हे गेली ४ वर्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर ची धुरा सांभाळत आहेत त्याचे काम व सर्वाना सोबत घेऊन जाणे,नवनवीन कल्पना,ट्रॅव्हल एजंट याना येणाऱ्या समस्यांचे निराकरण अश्या त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याना परत एकदा अध्यक्ष पदाची संधी सर्वानुमते दिली गेली आहे. यासाठी सर्व संचालक मंडळाची सातत्याने मोलाची साथ व सहकार्य मिळाले.
नवनिर्वाचित पदाधिकारी याचा लवकरच पदग्रहण समारंभ होईल. या सर्वाना मान्यवर उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ही भारतातल्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया या असोसिएशनची निगडित आहे तसेच ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ही कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ची सदस्य असून ही कोल्हापूर जिल्हा टुरिझम कमिटी तसेच कोल्हापूर एअरपोर्ट ॲडव्हायझरी कमिटी सदस्य पद भूषवत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!