पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी मंडलिकांना संसदेत पाठवा ;
शिवसेना नेते खासदार किर्तीकर.
चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा.
चंदगड ता. २२: “भारताचा नावलौकिक जगभर नेण्याची महान कामगिरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र कष्ट घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून खासदार संजय मंडलिक यांना संसदेत पाठवा.”
असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी केले.
चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथील स्वराज्य मल्टीपर्रपज हॉल येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मिळाल्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
खासदार किर्तीकर म्हणाले,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एस. टी. मध्ये सवलत, जेष्ठ नागरिकांना मोफत पास, मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रमाणे राज्य सरकार कडून २ हजार रुपये , मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार सुरू आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा मंडलिक यांनाच विजयी करण्याचे आवाहन खासदार किर्तीकर यांनी केले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष
राजेखान जमादार म्हणाले, ” कोल्हापूरचा खासदार म्हणून संजय मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करून मोठी विकास कामे पुर्णत्वास नेली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या कडे ८०० कोटी रुपयांचा निधी आणला. विमानतळ , रेल्वे , आरोग्य महामार्ग यासाठी हजारो कोटीच्या निधीचा पाठपुरावा केला. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील कोणकोणत्या गावांना किती निधी मंजूर केला याची माहिती दिली”
यावेळी जिल्हा उपसंघटक डॉ नामदेव निट्टुरकर व उपतालुकाप्रमुख सौ.सुजाता कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशोवर्धन मंडलिक व सौ.किर्तिकर उपस्थित होत्या.
मेळाव्याला उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर,युवा सेना तालुका प्रमुख गजानन गावडे , वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला,शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत नौकुडकर, शिवसेना चंदगड तालुका सचिव अविनाश पाटील,उपतालुकाप्रमुख नामदेव सावंत, युवा सेना उपतालुकाप्रमुख कैलास बोकडे,मनोहर पाटील, विभाग प्रमुख अनिल गावडे, केदारी निवगीरे, यल्लापा पाटील, संभाजी पाटील,बाळू कडोलकर,पप्पु गावडे, श्रीकांत सुभेदार, दौलत चव्हाण, डॉ.कलखांबकर, संजय गांधी सदस्या सौ.छाया कांबळे तालुका प्रमुख सौ . इंद्रायणी बोकमुरकर, सौ . सुनिता कांबळे , उपतालुकाप्रमुख सौ.वंदना सुभेदार, अनिता पाटील, लता पाटील, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक शिवसेना तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे यांनी केले.आभार सुजाता कुंभार यांनी मानले.