उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहाणार ……
भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई
गारगोटी
बिद्री सहकारी साखर कारखाना चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 218 गावातील 65 हजार सभासदांच्या मालकीचा आहे ,उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
श्री.देसाई पुढे म्हणाले की,फक्त राजकारण न करता कारखान्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प उभे करून यशस्वीरित्या चालवून सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर देऊन सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे हे निवडणुकीमध्ये अधोरेखित झाले आहे,
चांगला चाललेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याला ब्रेक लावण्याचे काम विरोधकांनी करू नये.
उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताची नाही अशा कारवाईमुळे सभासदांच्या हिताला बाधा येऊ शकते विरोधक आपल्या राजकीय स्वार्थासाठी चांगलाचाललेल्या बिद्री कारखान्याच्या बदनामीचा घाट घालून आपली आघोरी महत्वकांक्षा पूर्ण करू इच्छित आहेत.
उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी गारगोटी चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर उपस्थित होते.
फोटो…… राहुल देसाई