स्वाभिमानीच्या चळवळीला ताकद देण्यासाठीच मिणचेकरांना आमदार करा – मा. खास. राजू शेट्टी
रांगोळी / प्रतिनिधी
स्वाभिमानीच्या चळवळीला ताकद देण्यासाठीच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवार दिली आहे. विद्यमान आमदार आवळे हे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे निवडून आले असताना सुद्धा यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील विधेयक होत असताना देखील विधानभवनात विरोध केला नाही . महायुती व महाविकास या दोन्ही सरकारने सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. वारणा कारखाना मागिल 50 रुपये कधी देणार असे विनय कोरे यांना बापू विचारणा का ? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला . रांगोळी येथील डॉ सुजित मिणचेकरांचा प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
डॉ सुजित मिणचेकर म्हणाले माझ्या आजपर्यंतच्या विजयामध्ये रांगोळी गावचा नेहमीच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या वेळच्या विजयात देखील रांगोळी गावाचा सिंहाचा वाटा असेल यात शंका नाही. ज्याप्रमाणे मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून 22 वर्ष काम केले त्याचप्रमाणे संघटनेत देखील ही मी निष्ठावंत राहीन.
यावेळी आप्पासो सादळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख राजाराम देसाई , आप्पासाहेब एडके, पुरंदर पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुकाप्रमुख दौलत पाटील, विनोद पाटील, रघुनाथ नलावडे, एम आर पाटील, सुशिल पाटील, केवल पाटील, रमेश पाटील, दीप पाटील, पांडुरंग सौंदलगे, दीपक मोरे, प्रकाश पाटील, सुशांत भोसले, आकाश कांबळे, निखिल कुरणे,
ग्रामपंचायत सदस्य अर्चना मगदूम, दीपाली हुन्नूरगे, सोनल ताई कांबळे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.