*शीर्षक -* *अखेर विजयदुर्ग बंदरात ‘आय.एन.एस.गुलदार’ जहाज येणार……* *बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश* *विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने वेधलं होतं लक्ष*

Spread the news

 

विजयदुर्ग  : अखेर भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आय.एन.एस.गुलदार ‘ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. यासाठी विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम आणि इतर सदस्यांनी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात लक्ष वेधलं होतं. त्या प्रयत्नांना आता यश आले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त आय.एन.एस.गुलदार जहाज सध्या कारवार नौदल तळ येथे असून ते विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून याबाबत निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे ८१ मीटर लांब आणि १२०० टन विस्थापन असलेली ३० मिमी क्लोज रेंज गन आणि राॅकेट लाँचर्सने सुसज्ज असलेली आय.एन.एस.गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० डिसेंबर १९८५ साली ही युद्धनौका नौदलात समावेश करण्यात आली. युद्धसज्जतेव्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरलं जात होतं. अशी ही महत्त्वपूर्ण युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विशेष प्रयत्न केले.

 

आरमारासाठी अत्यंत सुरक्षित असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या खाडीमध्ये नौदलाची ‘आय.एन.एस. गुलदार’ उभी करण्यात यावी, जेणेकरून आरमारी विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो संख्येने येणारे पर्यटक याचा लाभ घेऊन जिल्ह्याचे पर्यटन वाढेल याबाबत बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते.
यासंदर्भात किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पत्र देण्यात आले होते. विजयदुर्ग खाडी ही सुमारे ४२ किलोमीटर लांबीची असून ४० ते ५० मीटर खोल आहे. दरम्यान, नागमोडी वळण आणि खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित खाडी वादळी परिस्थितीतही नौकांना उपयुक्त आहे. आरमारी गनिमी काव्यासाठी हे मोक्याचे ठिकाण आहे.
सन २००५ साली विजयदुर्ग किल्ल्याचा अष्टशताब्दी किल्ले महोत्सव पार पडला. त्यामुळे येथील पर्यटन वाढले असून किल्ले विजयदुर्ग, आरमारी गोदी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र अशा प्रकारचा पर्यटनात्मक प्रकल्प आल्यास पर्यटन अधिकाधिक वाढून रोजगार निर्मिती होईल. ना. नितेश राणे यांनी संबंधित बंदर खात्याचा कारभार स्वीकारल्यामुळे विजयदुर्गवासीयांची ही मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत होता. आता प्रत्यक्षात तो सार्थकी होत असल्याने विजयदुर्गवासियांमध्ये आनंद साजरा होत असून बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना विशेष धन्यवाद देण्यात येत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!