बहुजन समाजातील हजारो तरुणांना उद्योजक बनवून शाहूंचा वारसा समरजितराजेंनी कृतीतून चालविला* *वीरेंद्रसिंह घाटगे* *सेनापती कापशीत घरोघरी जाऊन साधला नागरिकांशी संवाद*

Spread the news

*बहुजन समाजातील हजारो तरुणांना उद्योजक बनवून शाहूंचा वारसा समरजितराजेंनी कृतीतून चालविला*

*वीरेंद्रसिंह घाटगे*
*सेनापती कापशीत घरोघरी जाऊन साधला नागरिकांशी संवाद*

सेनापती कापशी प्रतिनिधी.
छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील तरुणांना उद्यमशील होण्यासाठी प्रोत्साहन दिले.बहुजन समाजातील हजारो तरुणांना यशस्वी उद्योजक बनवून शाहूंचा वारसा समरजितराजेंनी कृतीतून चालविला.असे प्रतिपादन राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी केले.

सेनापती कापशी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ भेटी-गाठीवेळी ते बोलत होते. घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

घाटगे पुढे म्हणाले, कोरोनानंतर नोक-या गेल्यामुळे अनेक तरुणांना घरी बसावे लागले होते.अशावेळी हाताला काम नसल्यामुळे तरुणाई निराश होती.अशा परिस्थितीत राजे समरजितसिंह घाटगे यांनी मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. स्थानिक यशस्वी उद्योजकांच्या साथीने तरुणांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. राजे बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून पंधराशेहुन अधिक तरुणांना दीडशे कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कर्ज पुरवठा केला. त्यामुळे या तरुणांना व्याज सवलत मिळाली. याशिवाय राजे बँकेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज व्यवसाय कर्ज योजना ही सवलतीचे व्याजाची योजना राबवली. त्याचाही तरुणांनी फायदा झाला. त्यामुळे अनेक तरुण व्यावसायिक बनले. त्यांनी इतर तरुणांना रोजगार दिला.समरजितराजेंनी शासनाच्या उद्योग व्यवसायासाठीच्या अनुदानाचाही अनेक तरुणांना लाभ मिळवून दिला. तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी करण्याचा अजेंडा घेऊन कार्यरत असलेल्या समरजितराजे यांना आमदार म्हणून निवडून देऊया.

यावेळी तुकाराम भारमल ,मकरंद कोळी, दयानंद घोरपडे ,सुधाकर वारोसे सुनील रणवरे ,दीपक कुरणे, पोपटी खराडे, खंडू चंदावले, अक्षय कडगावकर अमोल कांबळे, सुनील कांबळे उपस्थित होते

चौकट

राजेंना आमदार करण्यात युवक आघाडीवर-उमेश देसाई

जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई म्हणाले,कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात समरजीतराजेंनी ज्येष्ठांना मान, महिलांना सन्मान देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. युवकांनी नोकरीच्या मागे न लावता व्यवसाय करावा, यासाठी त्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले.हेच स्वावलंबी युवक समरजीतराजेंना आमदार म्हणून निवडून आणण्यात आघाडीवर असतील.

छायाचित्र सेनापती कापशी येथे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधताना वीरेंद्रसिंह घाटगे सोबत उमेश देसाई


Spread the news

You may also like

error: Content is protected !!