संघटनेला सामाजिक उपक्रमांची जोड देणाऱ्या माळी समाज संघटनेचे कार्य आदर्शवत
कोल्हापूर : ” समाज बांधवाचे संघटन करताना त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देत लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा
संघटने”ने जे कार्य केले आहे ते आदर्शवत आहे.
’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी काढले.
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेतर्फे आयोजित गुणी विद्यार्थी बक्षीस समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा व समाजातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त
समारंभ झाला. या समारंभात संघटनेच्यावतीने देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ.
बी. वाय. माळी यांना प्रदान करण्यात आला. आनंदी गणपतराव माळी यांना आदर्श माता पुरस्कार तर तेरवाड येथील सदाशिव माळी
यांच्या कुटुंबांला आदर्श कुटुंब पुरस्कारांनी सन्मानित केले. या समारंभासाठी माजी महापौर सागर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू
स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या समाजातील कर्तबगारांचा सत्कार झाला. तसेच हुशार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप
केले. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्ही. बी. पाटील यांनी, ‘कोल्हापुरात माळी समाजाने
आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाज संघटित होत आहे. समाज संघटन सोबतच त्याला विविध लोकोपयोगी
कार्यक्रमांची जोड देऊन सामाजिक बांधिलकीही जपली आहे. कोल्हापुरातील सामाजिक उपक्रमाताही समाजाचा सहभाग आणि योगदान
वाखणण्याजोगा आहे.’
माजी महापौर सागर चव्हाण यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सत्कारमूर्तींना शुभेच्छा व्यक्त केल्या. समाजाच्या कार्याला आपला नेहमी पाठिंबा
राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजाचे माजी अध्यक्ष सितारामबापू चौगले, एम. बी. माळी व महादेव चौगुले यांचा कृतज्ञता सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास रावसाहेब डी.बी. माळी शैक्षणिक फंड निधीचे अध्यक्ष अण्णासाहेब माळी, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, संघटनेचे उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला संघटनेच्या अध्यक्षा साधना माळी, उपाध्यक्ष वंदना माळी, कार्याध्यक्ष मीनाक्षी माळी, सचिव राजाराम यादव, खजिनदार किशोर माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासो माळी, इचलकरंजीचे माजी नगरसेवक युवराज माळी, रेंदाळचे माजी सरपंच विजय माळी, प्राचार्य जी.पी. माळी, उद्योजक प्रभाकर कुलगुडे, अशोक माळी, काशिनाथ माळी, बाळासाहेब माळी, तानाजी माळी, राजाराम माळी, शशिकांत माळी, गणपत बेलकुड, महेश माळी, संजय कोरे, चंद्रकांत चिपरे, विद्या माळी, भारती माळी, पुष्पा माळी, श्रुती कुलगुडे, भारती मानकर, वैशाली गोंधळी, इंद्रायणी चौगुले, रूपाली माळी, गोकुळा माळी, वैशाली माळी, भाग्यश्री माळी, आनंदी चौगुले, यांच्यासह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे माजी सचिव संतोष माळी यांनी केले. आभार महिला संघटनेच्या अध्यक्षा साधना माळी यांनी मानले.