जगातील, पहिला शस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसबा बावड्यात…
राहुल गांधी यांच्या हस्ते होणार अनावरण
कोल्हापूर
कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत आहे. जगातील, पहिला महाराजांचा हा 12 फुटी शस्त्रधारी पुतळा असणार आहे. कसबा बावड्याच्या प्रवेशद्वाजवळच शिवाजी महाराजांचा पुतळा असावा अशी गेली अनेक दिवसापासून आमदार सतेज पाटील यांची इच्छा होती. ती आता, पूर्णत्वास आली आहे. त्याचा अनावरण समारंभ शुक्रवारी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शस्त्रधारी पूर्णाकृती पुतळा कसबा बावडा येथील भगव्या चौकात बसविण्यात आलाय. जगातील पहिला महाराजांचा हा शस्त्रधारी पुतळा असणार आहे .१२ फूट उंचीचा हा पुतळा असून त्याचे वजन सुमारे दोन टन असणार आहे. हा पुतळा ब्रॉंझ धातूपासून मजबूत बनवला आहे . या पुतळ्याचा खर्च डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीन स्वनिधीतून करण्यात आला आहे. यासाठी डॉ डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील तसच शिवप्रेमींचे मोठे योगदान आहे. या पुतळ्याचं उद्घाटन उद्या शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. त्याची सर्व जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे.
पाचगाव येथील शांतीनगर या ठिकाणचे मूर्तिकार सतीश घारगे यांनी या पुतळ्याचे काम केले आहे. पुतळ्याचे काम सुरू झाल्यापासून, ते पुतळा बसवण्यापर्यंत गेली सहा महिने दिवस रात्र आमदार ऋतुराज पाटील यांनी मोठ परिश्रम, घेतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन तैलचित्रावरून बारकाईने अभ्यासाद्वारे महाराजांचा हा पुतळा तयार करण्यात आलाय. या पुतळ्याची सुरेख अशी रचना करण्यात आली आहे. यासाठी ऐतिहासिक संदर्भानुसार हा पुतळा तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचा साकारण्यात येणारा पुतळा अतिशय मजबूत आणि आकर्षक आहे. जगातील एकमेव पूर्णाकृती, शस्त्रधारी पुतळा असून हातात महाराजांची आवडती मराठा धोप तलवार आणि दांडपट्टा आहे. १६ व्या शतकातील महाराजांचे समकालीन छायाचित्रे जगभरात उपलब्ध आहेत … त्यापैकीच साम्य असणारा हा पुतळा आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीमुळ कसबा बावडास ऐतिहासिक वारसा आहे. तसच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलामुळे कसबा बावडा गावाचे नाव राज्य, देश आणि जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहे. त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा पुतळा कसबा बावडा मध्ये व्हावा , अशी इच्छा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. या पुतळ्यासाठी आदर्श आणि तत्कालीन चेहरेपट्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीचा चेहरा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या संपूर्ण पुतळ्यावरील कट्यार, उजव्या हातातील पट्टा आणि डाव्या हातामधील तलवार या सर्व शस्त्रावरील तंतोतंत डिझाईनचा वापर, पोषाखावरील नक्षीकाम तंतोतंत तत्कालीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगडवरील नगारखाण्याचा संदर्भ घेऊन प्रवेशद्वार आणि त्यावरील सर्व नक्षीकाम आकारण्यात आले आहेत.
- दरम्यान ज्या चबुतऱ्यावर, महाराजांचा पुतळा बसविण्यात आलाय त्या चबुतरा भोवतीचे नक्षीकाम कोल्हापूरमधील भवानी मंडप, राजवाडा, रंकाळा या सर्वांचा अभ्यास करून उभा केले आहे. मुख्य पुतळ्यासमोर लहान आयलंडवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राजमुद्रा बसवण्यात आली आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यात आल्याने, सर्वत्रचं उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण कसबा बावड्याचा परिसर शिवमय झाला आहे. त्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा देखील आता लोकांना लागून आहे.