श्रेयवादातून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम रखडविण्याचे पाप मुश्रीफांनी केले. : समरजितसिंह घाटगे : पिंपळगाव बुद्रुक येथे जंगी सभा

Spread the news

: श्रेयवादातून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम रखडविण्याचे पाप मुश्रीफांनी केले.
: समरजितसिंह घाटगे
: पिंपळगाव बुद्रुक येथे जंगी सभा

म्हाकवे,प्रतिनिधी.
पालकमंत्री सात हजार कोटी रुपयांची विकासगंगा कागल, गडहिंग्लज उत्तूर विभागात आणली म्हणतात.यामध्ये त्यांनी रस्ते व गटर्सच्या तुलनेत आरोग्य विभागाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. स्वतःला महाडॉक्टर म्हणून घेणाऱ्या
पालकमंत्र्यांमुळेच कागल गडहिंग्लज उत्तूर विभागातील आरोग्य विभागच आजारी पडला आहे. अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल) येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेवेळी ते बोलत होते. यावेळी अभिजीत तापेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत समरजितसिंह घाटगे यांना कार्यकर्त्यांसह पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, पालकमंत्र्यांनी काढलेल्या विकास कामांच्या पुस्तकात रस्ते व गटर्सवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे.‌ यामध्ये त्यांच्या मर्जीतील मोजके चार कॉन्ट्रॅक्टदार मोठे झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. मात्र या ठिकाणी सर्व सोयीनेयुक्त इमारत, स्वच्छतागृह, पूरेसा स्टाफ, औषधे व इतर अनुषंगिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे ही पालकमंत्र्यांची जबाबदारी होती. मात्र त्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. तर तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याकडे पाठपुरावा करून पिंपळगाव बुद्रुक येथील आरोग्य केंद्रासाठी आम्ही निधी मंजूर करून आणला होता. त्यामुळे या विभागातील नागरिकांची सोय झाली असती. मात्र केवळ श्रेय वादातून त्यांनी तो मंजूर निधी रद्द करून त्यास पुन्हा मंजुरी घेतली. त्यांच्या या श्रेयवादाच्या प्रवृत्तीमुळे या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम रखडले. त्यामुळे या विभागातील नागरिक आरोग्याच्या सोयीपासून वंचित राहिले. या पापास पालकमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी अनेक मंजूर झालेले कामे पूर्ण झाल्याचा उल्लेख पुस्तिकेत करून नागरिकांची दिशाभूल केली आहे. एक वेळ आमदारकीची संधी द्या. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करु.”
यावेळी प्रदीप पाटील,स्नेहल पाटील,अर्जुन माने यांनीही मनोगत व्यक्त केले.सभेस शाहूचे संचालक डी एस पाटील, शिवानंद माळी, सचिन पाटील, रणजीत हवलदार, चंद्रकांत दंडवते, स्वाती पाटी, गीता परीट, प्रदीप कांबळे, विकास कांबळे, प्रकाश माने, आनंदा सूर्यवंशी, नामदेव मांगोरे,यशवंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
संभाजी ताशिलदार यांनी स्वागत केले.विलास सुर्यवंशी यांनी आभार मानले.

चौकट-

संधीचे सोने करूया

गोकुळचे माजी चेअरमन रणजीसिंह पाटील म्हणाले, महाविकास आघाडी व घटक पक्ष म्हणून आपण समरजीतराजेंच्या रूपाने कागल विधानसभेच्या निवडणुकीस सामोरे जात आहोत. यावेळी सुज्ञ व स्वाभिमानी जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये असून मोठ्या प्रमाणात होत असलेले पक्षप्रवेश ही परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे. त्यामुळे सर्वांनीच एकसंघपणे निवडणुकीस सामोरे जाऊन छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याच्या वंशजास आमदार म्हणून निवडून देण्याच्या संधीचे सोने करूया.”

छायाचित्र- पिंपळगाव बुद्रुक येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे,समोर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!