विरोधकांनाही त्रास न देणाऱ्या पी.एन. पाटील यांचा वारसा जपणाऱ्या राहूल विजयी करण्याची जबाबदारी आमची राहूलच्या विजयासाठी सारे पुनाळ ग्रामस्थ एकवटले ,  गावात उस्फूर्त प्रतिसाद

Spread the news

 

 

विरोधकांनाही त्रास न देणाऱ्या पी.एन. पाटील यांचा वारसा जपणाऱ्या राहूल विजयी करण्याची जबाबदारी आमची

 

राहूलच्या विजयासाठी सारे पुनाळ ग्रामस्थ एकवटले ,  गावात उस्फूर्त प्रतिसाद

 

पुनाळ :

 

करवीरचे नेतृत्व करत असताना ज्या स्व.आम.पी. एन.पाटील यांनी कधीही विरोधकांनाही त्रास दिला नाही. आलेल्या व्यक्तीचे काम करणे, त्याच्या संकटकाळात मदत करणे हीच वृत्ती त्यांनी आयुष्यभर सांभाळली. त्यांचाच वारसा जपण्याचे काम त्यांचे सुपूत्र राहूल पाटील हे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची जबाबदारी आमची आहे, असे म्ह्णत संपूर्ण पुनाळ गाव एक झाले. राहूल यांच्या विजयाच्या घोषणा देत एकीचा संदेश दिला. यामुळे या भागात पाटील यांचे मताधिक्य निश्चित झाले आहे.

 

पन्हाळा तालुक्यात पी.एन. पाटील यांना नेहमीच प्रतिसाद मिळत होता. यंदाही राहूल यांच्या पाठिशी या भागातील प्रत्येक गाव असल्याचे चित्र आहे. प्रत्येक गावात पाटील यांना अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या भागात सहानुभूतीची लाट आहे. याच लाटेवर स्वार होवून प्रचार सुरू आहे. प्रत्येक मतदार राहूल यांना विजयी करण्यासाठी विश्वास देत आहे. यामुळे या भागात मोठे मताधिक्य मिळणार हे निश्चित झाले आहे.

 

पुनाळ येथे झालेल्या सभेत अनेकांनी राहूल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पन्हाळ्यात विकासकामे करताना कधी गटतट पाहिला नाही. सर्वांची कामे करण्याला प्राधान्य दिले. पुनाळ गावालाही चांगला निधी दिला आहे.पन्हाळ्यातील जनतेशी त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या माघारी आम्ही राहुल पाटील यांच्यासोबत असून पुनाळमधून सर्वाधिक मते देणार असा विश्वास पुनाळ (ता. पन्हाळा ) येथील सभेत पुनाळ – तिरपण धरण सोसायटीचे संचालक सुनील पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी  माजी पोलीस पाटील शामराव पाटील होते.

 

यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील म्हणाले, स्व.आम.पी.एन.पाटील यांनी येणाऱ्या प्रत्येकाची कामे केली. जिल्ह्याच्या  विविध संस्थेवर त्यांनी नेतृत्व करताना विरोधक असला तरी त्यांना त्रास देण्याची भूमिका कधी घेतली नाही. आपल्या आयुष्याची ४० वर्षे जनतेसाठी वाहिले. हा कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी वडिलांप्रमाणे आपली सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन केले.

 

गोकुळचे संचालक चेतन नरके म्हणाले, राजकीय व सामाजिक जीवनात स्व पी.एन.पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी राहुल पाटील सक्षम आहेत. ते विकासाचे व्हिजन घेऊन जाणारे युवा नेतृत्व आहे. पन्हाळ्यातील अरुण नरके समर्थक राहुल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहणार.

 

गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, स्व. पी. एन. पाटील यांनी कितीही संकटे आली, राजकीय पीछेहाट झाली तरी काँग्रेसवरील पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. याऊलट विरोधी उमेदवार काँग्रेसमधून शिवसेनेत गेले, दोन वेळा आमदार झाले. आणि ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहण्याची गरज होती तेव्हा गद्दारी करून त्यांची साथ सोडली. एका निष्ठावंत आहे आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आहे. त्यामुळे निष्ठावंत पी.एन.पाटील यांच्या वारसाला राहुल पाटील यांनाच विजयी करूया.

 

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी चव्हाण, राजेंद्र खानविलकर, शेकापचे बाबासो देवकर, शाहू काटकर, भारत मोरे, गजानन पाटील, सोपान सुतार, उपसरपंच सुमन चव्हाण, ग्रा. पं. सदस्य बळवंत पवार, यल्लाप्पा पवार, अमर पवार, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!