बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही; आमदार सतेज पाटील*

Spread the news

 

*बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही; आमदार सतेज पाटील*

*आमदार सतेज पाटील यांनी, एन्काऊंटर घटनेबाबत सत्ताधाऱ्यांना केलेत अनेक प्रश्न*

*कोल्हापूर :* घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मताचे आम्ही सर्वजण आहोत. मात्र ज्या पद्धतीन एन्काऊंटरची घटना घडली आहे.. त्यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. यामध्ये कोणतेही दुमत नाही. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत. हे संयुक्तिक नाही. आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे. शिवाय या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यांनी देखील आक्षेप घेतला आहे. आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आले होते? असे अनेक प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना केले.ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले होते. त्यावेळी ते, पत्रकारांशी बोलत होते. चार्जशीट फाईल झाली होती, मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आले? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती? असे अनेक प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

दरम्यान, आरोपीने पोलिसांच्यावर गोळीबार करणे हे गृह खात्याची नामुष्की आहे. पण एन्काऊंटर झाले की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात. वेगळ्या पद्धतीचे वातावरण होते. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवरून गृह खात्याची इमेज कशी होत आहे. हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचा टोलाही आम.सतेज पाटील यांनी लगावला.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर घटनेची चौकशी हा विषय नाही. मात्र हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडली. हे समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे घटनेबाबत पोलीस महासंचालकांनी भूमिका स्पष्ट करावी. असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी ही होत आहे. त्यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले खर तर फडणवीस यांनी बदलापूर घटना, अंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते.असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातल्या विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे. यावर आता भाजपचे लोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर, टीका करत आहेत. बारामती मध्ये गेल्या 35 वर्षात कधीही अजित दादांच्या पोस्टरवर काळे फडके लावण्यात आले नाही. ते आता घडत आहे. तुम्ही टीका करायची आणि आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊन बाहेर पडायचे असे भाजपचा प्लॅन सुरू आहे. मात्र, महायुती म्हणुन ते सर्वजण एकत्र लढू देत किंवा स्वतंत्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे. अशी टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.

कोल्हापुरातील दहा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही. काँग्रेस, त्याचबरोबर शरद पवार गट, ठाकरे गट, आम्हीं सर्वजण जागा मागत आहेत. मात्र समोपचाराने चर्चा करून जागांचे वाटप होईल आणि एकोपा दिसेल. दीडशेहून अधिक जागा वाटप झालेले आहेत. आणखी काही आहेत ते तीस आणि एक तारखेला स्पष्ट होईल आणि दहा तारखेपर्यंत सर्व निर्णय होतील. आम्ही तिन्हीही पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्याला देण्यासाठी वचनबद्ध आहोत. असेही त्यांनी सांगितले.
राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. भाजप एक संघ ठेवू शकत नाही हे दिल्लीच्या नेतृत्वाला कळालेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्राचे वारंवार दौरे करावे लागत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!