बँकांकडून कपात केलेली लाडकी बहीण योजनेमधील रक्कम त्यांच्या खात्यावर 7 दिवसांत वर्ग करा अन्यथा आंदोलनाचा इशारा :- भाजपाचे जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांना निवेदन

Spread the news

बँकांकडून कपात केलेली लाडकी बहीण योजनेमधील रक्कम त्यांच्या खात्यावर 7 दिवसांत वर्ग करा अन्यथा आंदोलनाचा इशारा :- भाजपाचे जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांना निवेदन

कोल्हापूर

महायुती सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या हितासाठी अत्यंत चांगली योजना आणली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. योजनेमुळे महिला वर्गामध्ये अत्यंत उत्साह असून त्याचे लाभ महिलांना मिळाले आहेत. सदर योजने बद्दल महिला समाधान व्यक्त करत आहेत आणि आनंद व्यक्त केला आहे. पण महिलांच्या खात्यावर जमा झालेले हे पैसे काही बँका बँकिंग चार्जेस च्या नावाखाली कट (कपात) करत आहेत. याविषयात आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांना जाब विचारत फौलावर घेतले.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, बँकांच्या मनमानी कारभारामुळे सरकारच्या महत्वकांक्षी योजनेतील पहिला 3000 रुपयेचा हप्ता केवळ बँकांमुळे महिलांना न मिळणे ही बाब खेदास्पद आहे. बँक खाते आधार लिंक केल्यानंतर लाभार्थी महिलांना कुठलीही कल्पना न देता बँकेने ते पैसे दंड स्वरूपात कोणत्या अधिकारात घेतले. जिल्हाधिकारी कोल्हापूरच्या यांचे याविषयात सविस्तर पत्र प्रत्येक बँकांना प्राप्त होऊन देखील ही मनमानी कोणत्या हेतूने, कोणत्या उद्देशाने होत असल्याचा सवाल करण्यात आला.
आपल्यावतेने पुन्हा एकदा लेखी आदेश सर्व बँकांना द्यावेत अशी मागणी केली.
याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुतात केली पण काही बँकांकडून अद्याप पैशांचे वितरण हे करण्यात आलेलं नाही असा सवाल उपस्थित केला.
बँकेमध्ये जमा होणारी रक्कम योजनेच्या अनुदानाची असून या पैशावर बँकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नसून हे पैसे महिलांच्या खात्यावर त्वरित वर्ग करावेत असे सांगितले.
याविषयी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांना प्रश्नांचा भडिमार करत फैलावर घेतले. त्याचबरोबर राज्य सरकारची ही महत्वकांक्षी योजना असून शासनाच्या आदेशानुसार महिलांचे पैसे हे परस्पर बैंक खाते कट करू शकत नाहीत त्यामुळे महिलांना संपूर्ण रक्कम मिळावी, ज्या बँकांनी ही रक्कम कट करून घेतली आहे त्यांनी ते पैसे रिफंड करावेत आणि लवकरात लवकर महिलांना त्या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यासंदर्भात आपल्याकडून 10 दिवसांमध्ये कोणतीही कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्व जबाबदारी सर्व बँका व संबंधित शाखाधिकाऱ्यांची राहील याची दखल घ्यावी असा इशारा शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आला.
शिष्टमंडळाच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक गणेश खडके हे निरुत्तर होऊन याविषयी आपली चूक मान्य करत सर्व बँकांना लेखी आदेश देऊन संबंधित बँकांवर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, सरचिटणीस गायत्री राऊत, संजय सावंत, हेमंत आराध्ये, संतोष भिवटे, विराज चिखलीकर, गिरीष साळोखे, सतीश आंबर्डेकर, श्वेता गायकवाड, सुमित पारखे आदी उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!