निवडून आल्या नंतर समाज्याच्या हितासाठीच मी पदाचा वापर करणार
मदन कारंडे यांची ग्वाही
इचलकरंजी : तुम्ही मला आमदार होण्यासाठी अत्यंत प्रामाणिक पणे बळ देत आहेत. निवडून आल्या नंतर समाज्याच्या हितासाठीच मी पदाचा वापर करणार आहे. ज्यावेळी समाजाचे हित साधन्याच्या मुद्द्यावर सरकारच्या धोरणात संभ्रमावस्था येऊन काही कमी जास्त होत असेल तर पदाचा त्याग करावा लागला तरी करू, असे आवाहन मदन कारंडे यांनी केले.
शहापूर येथे इचलकरंजीसह कोरोची, चंदुर, तारदाळ व खोतवाडी येथील मोठ्या प्रमाणात येऊन मराठा समाजाने कारंडे यांना पाठिंबा दिला. पाठिंबादरम्यान एक मराठा लाख मराठा , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा पाठिंबादरम्यान देण्यात आल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, प्रकाश मोरबाळे, एडवोकेट सचिन माने, अरविंद माने यांनीही मनोगत व्यक्त केले.
कारंडे पुढे म्हणाले, स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने हे मराठा समाजासोबत राहिले होते. परंतु, त्यांच्या जाण्यानंतर जी मराठा समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती. ती आता तुमच्या सर्वांच्या एकत्र येण्याने भरून निघत असल्याचेही कारंडे यांनी शेवटी नमूद केले. सागर चाळके म्हणाले, सण 2009 साली आम्ही अशाच पद्धतीने एकत्र आलो आणि इचलकरंजीचे नगराध्यक्ष पद मिळवण्यात यशस्वी झालो. या सर्वांनी मला पाठिंबा दिल्यानेच विरोधकांचा पराभव झाला. तशीच वेळ आता ही आली आहे. त्यामुळे मदन कारंडे हे विजय होतील हे निश्चित असल्याचे चाळके म्हणाले.
मराठी कधी एकत्र येत नाहीत परंतु कारंडे यांच्यामुळे सर्वजण एकत्र आले आहेत हा मोठा विजय असल्याचे सुहास जांभळे म्हणाले. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे या उद्देशाने जरांगे यांच्यामुळेच संघटित झालो. याठिकाणी मराठा झेंडा लावण्याचे काम तुम्हाला करायचे आहे यासाठी कारंडे यांच्या रूपाने सर्व मराठा एकत्र आला हे आनंद असून एक नवी क्रांती घडवून यासाठी कारंडे यांना मताधिक्य देऊन निवडून आणूया असे आवाहन हिंदुराव शेळके यांनी केले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, प्रकाश मोरबाळे, एडवोकेट सचिन माने, अभिजित रवंदे, डॉ.ऋषिकेश मुसळे, उदयसिंग पाटील, अजित मामा जाधव, अरविंद माने, यांनीही मनोगत व्यक्त केले.
कारंडे पुढे म्हणाले, स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने हे मराठा समाजासोबत राहिले होते. परंतु, त्यांच्या जाण्यानंतर जी मराठा समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती. ती आता तुमच्या सर्वांच्या एकत्र येण्याने भरून निघत असल्याचेही कारंडे यांनी शेवटी नमूद केले. सागर चाळके म्हणाले, सण 2009 साली आम्ही अशाच पद्धतीने एकत्र आलो आणि इचलकरंजीचे नगराध्यक्ष पद मिळवण्यात यशस्वी झालो. या सर्वांनी मला पाठिंबा दिल्यानेच विरोधकांचा पराभव झाला. तशीच वेळ आता ही आली आहे. त्यामुळे मदन कारंडे हे विजय होतील हे निश्चित असल्याचे चाळके म्हणाले.
यावेळी अमरजीत जाधव,बंडोपंत मुसळे,राजवर्धन नाईक,नितेश पाटील,वैभव खोंद्रे,सनी अनुरकर,दिलीप पाटील,शिवाजी पाटील,सागर जाधव,रणजीत शिंदे,रमेश देसाई,अतुल शेळके,अजय दुबल,प्रवीण केर्ले,संदीप जाधव,युवराज पाटील,संदीप पाटील,श्री जगताप,बबन घाटगे,संदीप जगताप,प्रसाद अनुरकर,रमेश पाटील,अवधूत मूडशिंगकर,उमाकांत लोंढे,निखील जमाले,चौगुले,प्रेम भोसले,भूषण माने,श्रेयस जाधव,शैलेश पवार,संतोष मांगले,बबलू खाडे,प्रकाश बरकाळे,सुधाकर रवंदे,प्रमोद कदम यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.