बुबनाळकरांनी दाखवलेला विश्वास मी विसरु शकत नाही गणपतराव पाटील यांची सेवक म्हणून काम करण्याची ग्वाही

Spread the news

बुबनाळकरांनी दाखवलेला विश्वास मी विसरु शकत नाही

गणपतराव पाटील यांची सेवक म्हणून काम करण्याची ग्वाही

शिरोळ/ प्रतिनिधी:
बुबनाळकरांनी केलेल्या स्वागताने आणि दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. मी आमदार नसतानाही विकासाची कामे केली. या कामाची सुरुवात बुबनाळ मधून झाली. जमीन क्षारपड मुक्तीची माझी कल्पना बुबनाळकरांनी उचलून धरली. माझ्यावर विश्वास ठेवला. यानंतर शिरोळ तालुक्यातील क्षारपड मुक्तीचे काम झाले. बुबनाळकरांनी दाखवलेला विश्वास मी विसरू शकत नाही. आता मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. मी तुमचा सेवक म्हणून काम करेन, अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली. तसेच निवडणूक निधी देणाऱ्या महिला बचत गट, ग्रामस्थ व तरुण मंडळांचे त्यांनी आभार मानले.
वैभव उगळे, विलास कांबळे, हसन देसाई, दिगंबर सकट, गणेश पाखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
बुबनाळ तालुका शिरोळ येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आणि कॉर्नर सभा घेण्यात आली. सदाफुली बचत गटाकडून गणपतराव पाटील यांना 11 हजार 111 रुपयांचा निवडणूक निधी देण्यात आला. आलिशान तरुण मंडळ व सुलतान तरुण मंडळाने गणपतराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
बी. जी. पाटील, प्रशांत शहापुरे, सरपंच शिवलीला ऐनापुरे, तातोबा शहापुरे, बापूसो राजमाने, मौला नदाफ, प्रकाश कुंभोजे, धरणेंद्रकुमार मरजे, गोगा बैरागदार, विद्याधर कुंभोजे, मौला बैरागदार, महादेव कबाडे, संजय केरीपाळे, सुधाकर शहापुरे, रमेश मांजरे, अमोल मांजरे, योगेश मांजरे, संतोष मांजरे, श्रीकृष्ण केरीपाळे, सुभाष शहापुरे, संजय तारदाळे, चाँद मकानदार, शहाबुद्दीन देवताळे, सिकंदर देवताळे, यासीन हिप्परगे, समीर उगारे, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, राजेंद्र प्रधान यांच्यासह विकास आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!