शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या उपक्रमांना मदत करू
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही
कोल्हापूर
उद्योग व्यवसाय सोबत भविष्यात स्मॅकने समाजाच्या प्रगतीसाठी आणि उपयोगासाठी उपक्रम राबवल्यास त्याला प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) च्या वतीने आयोजित दोन दिवशीय आरोग्य शिबिर प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन होते. यावेळी जेष्ठ उद्योजक स्व. रामप्रताप झंवर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जागतिक रक्तदान दिनानिमित्त दोन दिवसाचे रक्तदान शिबिर आयोजित केले. याशिवाय कामगारांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह रक्तदाब आणि डोळे तपासणी मोफत करण्यात येत आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा, पाच लाखांचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.
यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, उपाध्यक्ष जयदीप चौगले, ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, संचालक अतुल पाटील, निमंत्रित सदस्य विनायक लाटकर, दीपक घोंगडी, प्रकाश खोत, कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकलंगलेचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टरचे चेअरमन दीपक चोरगे.
इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचे कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष के. सिंग, ब्लड बँकेचे प्रमोद मंगसुळे, सीपीआर आरोग्य तपासणी टीमचे शशिकांत बल्लाळ, ईएसआयसीचे रामाशिष कुमार, पी एच सी शिरोली पुलाची चे डॉ. पंकज पाटील व या सर्वांची टीम आदी उपस्थित होते.