पन्हाळा तालुक्यातील राहुल पाटील यांना सर्वाधिक मतदान देणार
चेतन नरके यांची ग्वाही
कसबा ठाणे :
करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पाटील यांच्या पाठीशी अरुण नरके यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे त्यांना आतापासूनच आमदार म्हणण्यास कोणतीही अडचण नाही.राहुल हे उच्चशिक्षित तर आहेतच शिवाय त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील उठावदार कामगिरी केली आहे.
त्यांना पन्हाळा-गगनबावडा तालुक्यांतून सर्वाधिक मतदान देण्यासाठी आम्ही पायाला भिंगरी बांधून काम करीत आहे.असे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी केले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार राहूल पी.एन.पाटील यांच्या प्रचारार्थ कसबा ठाणे (ता.पन्हाळा) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील होते.
शेतकरी कामगार पक्षाबद्दल अफवा पसरवून विरोधकांनी आम्हाला कित्येकदा बदनाम केले आहे.मतदानाच्या अगोदर सुद्धा काही अफवा पसरवून दिशाभूल करतील पण त्यांच्या भूलथापांना आणि लबाडीला अजिबात थारा न देता राहूल पाटील यांना आमदार करुया. असे शेकापचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी सांगितले.
रखडलेल्या धामणी प्रकल्पासाठी स्व.आमदार पी.एन.पाटील आणि राधानगरी भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.कंत्राटदार पोसणाऱ्या माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी श्रेय लाटण्यासाठी लोकांची दिशाभूल करू नये.अशी टीका गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केली.
राहूल पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करताना या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना संपूर्ण जिल्हाभर राबविल्यामुळे माझ्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कार मिळाले.अशीच विकासकामे करण्यासाठी आपण मतदान करुन माझ्या विजयासाठी हातभार लावावा.मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध राहीन.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक,आरपीआय चे निवास सडोलीकर,रणजित पाटील,बाळासो दिंडे,
यांची भाषणे झाली.
यावेळीराजेंद्र खानविलकर,अमर पाटील, शशिकांत आडनाईक, शाहू काटकर,भरत मोरे, बाळासाहेब मोळे,दगडू पाटील,सुरेश पोवार,भरत इंजुळकर, निवृत्ती सुतार, रघुनाथ कांबळे, राजू म्हामुलकर, तानाजी मोरे, नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.
निवास पाटील यांनी प्रास्ताविक केले.