टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन

Spread the news

टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन

  1. U­

 


कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्स, पुणे येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी २६ मार्च २०२५ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे. मुलाखतीचे आयोजन सकाळी 9 वाजता संजय घोडावत आय.टी.आय. विभाग, अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य, स्वप्निल थिकने, अविनाश पाटील, सुजित मोहिते आणि इतर संपूर्ण स्टाप विशेष परिश्रम घेत आहेत.

  •  

संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!