तनिष्कच्या कोल्हापूर स्टोअर ला बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स अवॉर्ड”

Spread the news

 

तनिष्कच्या कोल्हापूर स्टोअर ला बेस्ट कस्टमर

एक्सपीरियन्स अवॉर्ड”

कोल्हापूर

तनिष्कच्या कोल्हापूर स्टोअर ला बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स अवॉर्ड” या नामांकित आणि प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला प्रसाद कामत तनुजा कामत व जय कामत यांना यावेळी गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण समारंभावेळी #तनिष्क चे रिजनल बिझनेस हेड नीरज भाकरे, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अरुण नारायण, रिटेल हेड सुनील राज, मर्चंडायझिंग हेड विजेश राजन आणि रिजनल बिझनेस मॅनेजर बिक्रमजीत, एरिया बिझनेस मॅनेजर शीतल सिरोया उपस्थित होते. #

याबाबत बोलताना कामत यांनी सांगितले की, प्रत्येक व्यवसायाचं यश ग्राहकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. विशेषतः ज्या क्षेत्रात स्पर्धा जास्त, त्यात पारदर्शक ग्राहकसेवा अत्यंत महत्वाची असते. सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या #तनिष्क ची वाटचाल आमच्या ग्राहकांमुळे अगदी उत्तमरित्या सुरू आहे. #तनिष्क सुरू करण्यापूर्वी #टायटन च्या माध्यमातून कामत कुटुंबीय ग्राहकांच्या सेवेत होतंच. टाटांच्या तत्वानुसार पारदर्शक व्यवहार, सर्वोत्कृष्ट उत्पादन आणि उत्तम विक्री पश्चात सेवा या सर्वांचा फायदा #तनिष्क सुरू झाल्यावर दिसून आला. या काळात आमच्या स्टाफनेही #तनिष्क च्या माध्यमातून ग्राहकसेवेचा आदर्श घालून दिला.

या सर्वांचा परिणाम म्हणून  #तनिष्क शोरूमला  मुंबईत पुरस्काराने गौरविण्यात आलं. या “बेस्ट कस्टमर एक्स पीरियन्स अवॉर्ड” बद्दल आमच्या असंख्य ग्राहकांचे आभार मानावे तेवढे थोडेच असेही कामत म्हणाले.

प्रसाद व जय कामत यांनी सांगितले की, पुरस्कार मिळणं ही आणखी एक सुरुवात असते असं आम्ही मानतो. यामुळे जबाबदारीचं भान आणि अधिक उत्तम सेवेची आस असणं स्वाभाविक आहे. आम्ही कामत कुटुंबीय आणि #तनिष्क चा स्टाफ यासाठी सदैव तयार आहोत. कितीही आव्हानात्मक परिस्थिती असू दे, #तनिष्क आपल्या प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहारांमुळे आणखी नवीन ग्राहकांपर्यंत पोहचेल याची खात्री आहे.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!