*आरोग्यदायी जीवनासाठी ‘हेल्थ फाॕर हर’ उपक्रमाचा लाभ घ्या*
*सौ.नवोदिता घाटगे*
*सिद्धनेर्लीत आरोग्य विषयक जनजागृतीपर कार्यशाळा*
सिद्धनेर्ली,ता.२०ःआरोग्यदायी जीवनासाठी महिलांनी ‘हेल्थ फाॕर हर’या उपक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.
येथे शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनातून राजे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने हेल्थ फाॕर हर या महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमवेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास सिद्धनेर्लीसह,एकोंडी व बामणी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
घाटगे पुढे म्हणाल्या,महिलांनी उद्यमशील बनून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा.यासाठी जिजाऊ समिती मार्फत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.त्याचा फायदा महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी झालेला आहे.मात्र त्या स्वतःच्या आरोग्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत.आजार असो वा दुखणे अंगावर काढण्याचा महिलांचा स्वभाव आहे.त्यामुळे त्यांना मोठ्या आजारास सामोरे जावे लागू शकते.महिलांमधील किरकोळ दुखण्याचे वेळेत निदान होऊन उपचार झाल्यास त्या निरोगी जीवन जगू शकतात.यासाठीच ‘हेल्थ फाॕर हर’ हा उपक्रम खास महिलांसाठी आयोजित केला आहे.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ.रक्षंदा घाडी म्हणाल्या,महिलांनी स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक रहावे.नियमित व्यायाम,योगासने करावीत.आवश्यकतेनुसार वेळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार करुन घ्यावेत.सकस आहाराबरोबर पुरेशी विश्रांतीही घ्यावी.
स्वागत बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील यांनी केले.सुत्रसंचलन उज्वला पोवार यांनी केले.आभार,वैजयंती बाबर यांनी मानले.
छायाचित्र सिद्धनेर्ली येथे हेल्थ फाॕर हर या महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमवेळी मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे
चौकट
…तर कुटूंबाची घडी विस्कळीत होऊ शकते
कुंटूंबाची संपुर्ण जबाबदारी सर्वच बाजूने महिला सांभाळतात.जर तीच आजारी पडली तर कुटूंबाची घडी विस्कळीत होऊ शकते.महिला जर निरोगी राहिली तर कुटुंबही आरोग्यदायी राहील.तिच्या आरोग्यविषयक काळजीसाठी महिलांसह इतर सदस्यांनीही जागरुक रहावे.असे आवाहन घाटगे यांनी केले.