*स्वप्नील कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी; युवासेनेकडून साखर – पेढे वाटून आनंदोत्स्व*
कोल्हापूर दि.०१ : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. कोल्हापूरच्या सुपुत्राच्या या पराक्रमाबद्दल कोल्हापूर युवासेनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरात साखर – पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेनेकडून फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना साखर पेढे वाटप केले. यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी, कोल्हापूर ही क्रीडा पंढरी असून, कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षि शाहू महाराजांच्या राजाश्रयाने अनेक खेळ कोल्हापुरवासीयांच्या रक्तात भिनले आहेत. याचा प्रत्यय आज पुन्हा अनुभवायला आला. कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. स्वप्नील कुसाळे याचा या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीय आणि कोल्हापूरकर म्हणून नक्कीच अभिमान आहे. सुमारे ७२ वर्षानंतर महाराष्ट्रातील खेळाडूने वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळविलेले पदक राज्यातील खेळाडूंना प्रेरणादायी आहे. त्याच्या या उत्तुंग कामगिरी बद्दल त्याचे व त्याच्या प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करताना त्याच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, शहरप्रमुख मंदार पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शहरप्रमुख तेजस्विनी घाटगे, जिल्हासमन्वयक अविनाश कामते, शहरसमन्वयक शैलेश साळोखे, सरचिटणीस दादू शिंदे, सरचिटणीस कुणाल शिंदे, मंगेश चीतारे, अजिंक्य जाधव, विपुल भंडारे, शुभम ठोंबरे, अभि ढेरे, अभिजित कदम, रोहन शिंदे, आकाश झेंडे आदी युवासेना पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते.