हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा.
गडहिंग्लज तालुक्यातून संजय मंडलिक यांना गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मताधिक्य देणार
. अमेय सदानंद हत्तरगी यांची ग्वाही
कोल्हापूर, ता. १९: ‘महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना संसदेत दुसऱ्यांदा पाठवण्यासाठी महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने गडहिंग्लज तालुक्यातून गेल्या वेळी पेक्षा उच्चांकी मताधिक्य देण्याचा निर्धार हत्तरगी गटाच्या वतीने अमेय हत्तरगी यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे राजाराम कारखान्यावर झालेल्या भेटीत उमेदवार संजय मंडलिक यांच्यासह माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अमेय हत्तरगी, गडहिंग्लज तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष वरदशंकर वर्दापगोळ, गंगाधर व्हस्कोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य मलगोंडा पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष महादेव साखरे, संकेश्वर कारखान्याचे संचालक उदय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू पाटील, श्री. नीळपणकर, सिद्धाप्पा कल्याणी ( हेब्बाळ), अशोक स्वामी, ॲड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भूषण पाटील बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमेय हत्तरगी म्हणाले,” माजी आमदार महादेवराव महाडिक आणि कुटुंबीय यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा व्यक्त करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करणार असल्याचे सांगितले.