धामणी प्रकल्प पी एन पाटील यांच्यामुळे झाला
राहुल पाटील यांचा सांगरूळ येथे जोरदार प्रचार
कोल्हापूर:
वर्षानुवर्षे रखडलेला धामणी प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी पाठपुरावा करून तीनशे कोटींचा निधी मंजूर करून आणला जुन्या कंत्राटदाराचे तब्बल एकशे सहा कोटींचे देणे शासनाला द्यायला लावले स्व.आमदार साहेबांचे यासाठी मोठे योगदान आहे. म्हणूनच त्यांचा वारस या नात्याने या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारुन उपस्थित राहिलो.पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे असताना देखील तुम्हाला साधे निमंत्रण सुद्धा दिले नाही यावरुन या प्रकल्पाला स्व.आमदार पी.एन.पाटील यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली हे सिद्ध होते.असा घणाघात करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.पाटील यांनी केला.
सांगरुळ (ता.करवीर) येथे सांगरुळ पंचायत समिती विभागाचा राहूल पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते.
राहूल पाटील पुढे म्हणाले, स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेबानी कधीही खोटे बोर्ड लावून जनतेची दिशाभूल केली नाही.उलट मंजूर विकासकामे पूर्ण झाल्यावरच उद्धाटनाचे फलक उभारले त्यामुळेच मतदारांना खऱ्या खोट्याची पूर्ण जाण आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधींचा भरघोस निधी खेचून आणणारे स्व.आमदार पी.एन.पाटील साहेब त्यांचे सुपूत्र असणारे राहूल पाटील म्हणजे अस्सल चोवीस कॅरेटचे सोने आहे.राहूल पाटील यांना आमदार करून एक कॉल प्रॉब्लेम सॉल चे पर्व अखंड सुरु ठेवूया.
करवीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीस सामोरे जाणारे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पी.पाटील यांना न भूतो अशा मताधिक्याने विजयी करून स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली वाहूया असे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
राहूल पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांना मतदारसंघातील नव्हे तर जिल्ह्यातील गाव आणि गाव माहिती आहे.त्यामुळे त्यांना मतदारसंघातील गावे माहित नाहीत असे बालिश वक्तव्य विरोधकांनी करु नये, असे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
मेळाव्यासाठी गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील,निवृत्ती आबा चाबूक,माजी सभापती डॉ.अनिता जंगम, अर्चना खाडे,जयसिंगराव हिर्डेकर, शशिकांत खोत, यशवंत खाडे,चेतन पाटील,सचिन पाटील, बाजीराव पाटील, रविंद्र पाटील, भरत खाडे,बाळासो यादव, अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.
उबाठा चे प्रशांत नाळे,अर्जुन पाटील यांचीही भाषणे झाली.
प्रकाश मुगडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
कृष्णात चाबूक यांनी आभार मानले.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागणाऱ्यांनी मातोश्रीशी गद्दारी केली आहे, त्यामुळे या गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी स्वतःच्या नावाने मते मागावीत म्हणजे यांना स्वतःची लायकी समजेल.अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रशांत नाळे यांनी केली.