महाराष्ट्राच्या विकासासाठी चंदगडचा गद्दार पहिल्यांदा गाढा
काहींचा इतिहास तपासा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन
नेसरीला झाली नंदाताईची वज्रमुठ सभा
प्रचंड गर्दीने दिली विजयाची साक्ष
चंदगड
महाराष्ट्र रुळावर आणायचा असेल तर महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील गद्दारी गाढण्यासाठी पहिला चंदगडचा गद्दार पहिल्यांदा गाढा असे थेट आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
चंदगड विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारासाठी नेसरी पिंपळकट्टा येथे वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते चंदगड मध्ये दहशत वाढत असून साडी, कुकर देणारे खूप येतील मात्र त्याला भुलू नका असे आवाहन नंदाताई बाबुळकर यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, मतदार संघात सोळाशे कोटीचा विकास केल्याचा डंका विरोधक वाजवत आहेत. पण, एवढया वेळा मी येथे येतोय, हा विकास मला कुठ दिसलाच नाही. अलीकडे या मतदारसंघात वेगळं संकट भेडसावत आहे. दहशतीचे वारे वाहत आहेत. या मतदारसंघाची परंपरा काय आहे आणि या मतदारसंघात काय चालले आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. एखाद्या माणसाला चांगलं भविष्य व इतिहास असावा लागतो ते नसणारी माणसं या निवडणुकीला उभी आहेत. अशा उमेदवारांपासून सावध रहा.
ते म्हणाले, या महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. लोकशाही टिकवायचे असेल बाबा कुपेकरांच्या विचारांची रूजलेली पाळेमुळे टिकवली पाहिजेत त्यांच्या विचारांचा उमेदवार निवडून द्यायला हवा.
चंदगड मध्ये दहशत वाढत असून साडी, कुकर देणारे खूप येतील मात्र त्याला भुलू नका असे आवाहन करून नंदाताई बाबुळकर म्हणाल्या, ही निवडणूक राजकारण, विकासाला दिशा देणारी आहे. विधानसभेत केवळ साडेसात मिनिट बोलणारे आमदार त्या मिनिटात या मतदारसंघाचे काय प्रश्न मांडणार. ही निवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असून आपल्याला पुढील पाच वर्षात काय पाहिजे हे महत्त्वाचे असून विचारांचा वसा आणि वारसा घेवून विकासाचं व्हिजन आपल्याकडे असल्याने त्यासाठीच आपण या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगून निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी गणेश फाटक, एम. जे. पाटील, नंदकुमार गोरुले, बाजीराव खाडे, ऍड. दिग्विजय कुराडे, सुनील शिंत्रे, शिवाजीराव खोत, रामराज कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, बेळगावचे माजी आमदार दिगंबर पाटील, बाळासाहेब कुपेकर, अमर चव्हाण, शिवप्रसाद दिली, रियाज शमनजी, संभाजी देसाई, संजयसिंह शिंदे, दिलीप माने, अंजना रेडेकर, जयश्री मुळीक, वैशाली पाटील, भिकाजी दळवी, उस्मान कदिम, कार्तिक कोलेकर, गोविंद नांदवडेकर, एम.एस. तेली यांच्यासह अन्य उपस्थित होते.
# # #