*महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक कामगार हॉस्पिटल उभारण्यात येईल*:*केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव.*
——————————
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री समवेत लवकरच संयुक्त बैठक
——————————
मुंबई :महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये कार्यरत कामगार वर्गाला आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्याच पाहिजेत ही केंद्र सरकारची भूमिका असून प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अत्याधुनिक कामगार हॉस्पिटल औद्योगिक वसाहतीमध्ये उभारले जाईल अशी ग्वाही देऊन, या संबंधी नियोजन करण्यासाठी “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीज” च्या पदाधिकाऱ्यासंबेत संयुक्त बैठक घेऊ अशी ग्वाही केंद्रीय श्रम मंत्री नामदार भूपेंद्र यादव यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील व अन्य कामगारांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात व त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक हॉस्पिटल्स उभारली जावी या मागणीसाठी महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व अन्य पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुंबई येथे भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या समस्या व अपेक्षा व वेगवेगळ्या असल्याने या संदर्भात पूर्ण राज्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, ईएसआईसी विभागाचे प्रमुख अधिकारी व श्रम मंत्रालयाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे प्रतिपादन भूपेंद्र यादव यांनी केले.
ईएसआईसी हॉस्पिटल व्यतिरिक्तही प्रॉव्हिडंट फंड, कर्मचाऱ्यांच्या विकासाच्या योजना, उद्योजक व कर्मचारी सौहार्द या संदर्भातल्या विविध प्रश्न संबंधी या बैठकीत चर्चा करून पुढील धोरण ठरविले जाईल असेही भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले. राज्यातील कामगारांच्या या मागणीसाठी तात्काळ व सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांना भूपेंद्र यांनी भूपेंद्र यादव यांना विशेष धन्यवाद दिले.
यावेळी चेंबरच्या कौशल विकास समितीचे चेअरमन संदीप भंडारी व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य विकास अच्छा उपस्थित होते.
फोटो :
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक कामगार हॉस्पिटल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन देताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सोबत अन्य पदाधिकारी