श्री साई फौंडेशन, जाधववाडी, कोल्हापूर. व पतंजली योगपीठ, हरिद्वार, यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “योग प्राणायाम शिबिर

Spread the news

 

श्री साई फौंडेशन, जाधववाडी, कोल्हापूर. व पतंजली योगपीठ, हरिद्वार, यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “योग प्राणायाम शिबिराचे” दिनांक 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर हॉल येथे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर योग शिबिरास श्री. विलास निकम गुरुजी योग शिक्षक तथा पतंजली जिल्हा सह प्रभारी, श्री. अशोक पाटील गुरुजी सह योग शिक्षक व सोनल शिरोळकर सह योग शिक्षिका, शेखर जी खापने यांनी विना मोबदला येऊन योग साधकांना विविध प्रकारच्या योगासनांचे व सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिलेत. दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या व्याधींना नागरिकांना सामोरे जावे लागते आणि विनाकारण वेळ आणि आर्थिक बोजा सहन करावा लागतो.

या दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे योगाद्वारे निरसन करता येते. असे योग ज्ञानातून, प्रात्यक्षिकाद्वारे सर्व योग साधकांना त्यांना समजावून सांगितलेत. त्यांच्याकडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त योगासनांचा सराव करून घेतला. तसेच पूरोहीत अन्नानी डोळ्यांचे व्यायाम शिकवले, दराडे गूरूनी पंचकर्म चिकित्सा प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. सदर योग प्राणायाम शिबिराचा आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सांगता समारंभ करण्यात आला.

उपस्थित योग साधकांनी सदर शिबिराबद्दल बोलताना पुढील काळात हा योग वर्ग घ्यावा असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील, उपाध्यक्ष श्री. नितीन पवार, सेक्रेटरी श्री. प्रमोद डकरे व संचालक श्री अनंत यादव उपस्थित होते. सदर प्रसंगी श्री विलास निकम गुरुजी, श्री अशोक पाटील गुरुजी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील, उपाध्यक्ष श्री. नितीन पवार यांच्या हस्ते तर सोनल शिरोळकर तसेच वर्षा शिंदे व रेष्मा पाटनेकर या महिला योग शिक्षकेंचा सत्कार सौ. सारिका पाटील, सौ. उमा पवार, सौ. राजमाला डकरे, सौ. सुरेखा यादव, सौ. पूजा डकरे, व सौ. माळकर मॅडम यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

प्रत्येक योग साधकास पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्यामार्फत योगाभ्यासाचे पुस्तक देण्यात आले. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये योगाचे असलेले महत्त्व श्री विलास निकम गुरुजींनी पटवून दिले. श्री शिवाजी पाटील यांनी वेळात वेळ काढून आपल्या आरोग्यासाठी योगाभ्यास करावा व भावी काळात कायमस्वरूपी योग वर्ग घेण्याचे आश्वासन देण्यात आले. सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रमोद डकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री नितीन पवार यांनी केले. सदर योग प्राणायाम शिबिरास भागातील महिला व पुरुष यांची उस्फुर्त साथ मिळाली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!