*श्री महालक्ष्मी अन्नछत्रच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद….४७४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…*
*श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट* यांचे वतीने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे *”भव्य रक्तदान शिबीर”* आयोजित करण्यात आले होते. श्री महालक्ष्मी धर्मशाळा, ताराबाई रोड, कोल्हापूर या ठिकाणी हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. अतिशय उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, चोख व्यवस्था या सर्व वैशिष्ट्यांसह सदरचा उपक्रम भव्य स्वरूपात पार पडला. शिबिरादिवशी सकाळी ८.०० वा. पहिल्या रक्तदात्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला. सायं ८.०० वा पर्यंत ४७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात ४७ महिलांनी रक्तदान करून रक्तदानाच्या या महाचळवळीत सहभाग नोंदवला.
संस्थेच्या वतीने रक्तदान करणा-या प्रत्येक व्यक्तीस महालक्ष्मी हेल्थ चेकअप कार्ड देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून रक्तदात्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व तपासण्यांवर २५% सवलत मिळणार आहे. सदर तपासणी श्रृतिका इमेजिंग अॅन्ड डायग्नोस्टिक सेंटर येथे होणार असून सर्व तपासण्या अत्याधुनिक मशीनवर केल्या जातील. त्याचबरोबर सर्व रक्तदात्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. अर्पण रक्तपेढी यांच्या मार्फत हे रक्तसंकलन केले गेले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
या शिबिराच्या सुरवातीला सदर उपक्रमाची माहिती प्रास्ताविकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांनी दिली. या शिबिराचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांना संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के. कुलकर्णी सुनिल जोशी, अँड.तन्मय मेवेकरी,वैभव कणसे,सौ.हर्षदा मेवेकरी, प्रतीक गुरव, रजत जोशी, आदित्य मेवेकरी,आशिष पाटील, सचिन पाटील,सुनिल खडके, प्रशांत तहसिलदार, विराज कुलकर्णी,रणजित सुगंधी, रवी फलटणकर ,तन्मय झाड, संग्राम सरनाईक, प्रसाद जोशी, सौंमित्र जोशी, प्रथमेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.सदर उपक्रमासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र, श्री महालक्ष्मी धर्मशाळा व धनलक्ष्मी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
—————————————————–