टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध

Spread the news

टोल माफीसाठी खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध

 

आमदार सतेज पाटील

कोल्हापूर

टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत, हे त्यांनी सिद्ध केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. मी टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली असून हा टोल नाका थर्ड पार्टी, कोणाकडे चालवायला आहे. हे देखील लवकरच सिद्ध होईल असा टोलाही त्यांनी मारला.

 

काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी, राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थाच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केले होते. यावरून, खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाले, टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत हे स्पष्ट होते.

 

दरम्यान टोल माफी आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आमदार सतेज पाटील यांनी याबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेच दाखल करायचे होते तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करायला हवा होता. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल होणार हे सरकारचे धोरण दिसत आहे. अशी टीकाही त्यांनी केली.

 

कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या पूरस्थितीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, पूरस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान एक दिवसांचा दौरा करायला हवा असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकी वेळी सहा दिवस मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात होते.. मात्र आपतीच्या वेळी सांगली आणि कोल्हापूरकडे त्यांनी पाठ फिरवली हे दुर्देवी असल्याचही त्यांनी सांगितले.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!