दक्षिण मतदार संघ ऋतुराज पाटलांनी भकास केला : खा. धनंजय महाडिक फुलेवाडी परिसरात महायुतीची पदयात्रा – निर्धार सभा

Spread the news

दक्षिण मतदार संघ ऋतुराज पाटलांनी भकास केला : खा. धनंजय महाडिक
फुलेवाडी परिसरात महायुतीची पदयात्रा – निर्धार सभा

ऋतुराज पाटील यांनी विकासाच्या नावाखाली दक्षिण विधानसभा मतदारसंघ भकास करून ठेवला आहे …
मोठमोठे निधीचे बोर्ड लावून विकास निधी आणल्याचा बनाव करून विकासाच्या बाता मारल्या आहेत. प्रत्यक्षात दक्षिण विधानसभा मतदारसंघात असणारा पाण्याचा प्रश्न, सार्वजनिक अस्वच्छता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुर्दशा यासारख्या अनेक प्रश्नांमध्ये ऋतुराज पाटील न्याय देण्यास अपयशी ठरले आहेत. यासाठी दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना आपण प्रचंड मतांनी निवडून दिले पाहिजे.
महायुतीने केंद्र व राज्य सरकारच्या सर्व समाज उपयोगी योजना आपल्या गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीला विजयी करावी विजयी करावे असे आहवान भाजपा नेते खा धनंजय महाडिक यांनी केले .फुलेवाडी येथे झालेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.
फुलेवाडी परिसरातून भाजपा उमेदवार अमल महाडीक यांना प्रचंड मताधिक्य मिळेल हे आजच्या यशस्वी झालेल्या पदयात्रा आणि सभेवरून दिसून येत आहे. शिक्षणाची – आरोग्याची प्रभावी व्यवस्था कशाप्रकारे थेट अंतिम लाभार्थी पर्यंत पोहोच करणार हीच गरज ओळखून प्रधानमंत्री मोदींनी अशा अनेक योजना आणल्या ज्याच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांचे जीवन जगणं सुखकर झालेला आहे जे गेल्या ७० वर्षांमध्ये झालं नव्हतं ते काम या ठिकाणी केलेले आहे असे ही खासदार धनजंय महाडीक यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यावेळी म्हणाले कि ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच होऊ नये यासाठी राज्यभर मोर्चे काँग्रेसच्या नेत्यांनी काढले, न्यायालयात ही धाव घेतली. मात्र आज प्रचंड मिळत असलेला प्रतिसाद पाहून दुसऱ्या नावाने ही योजना राबवणार ते सांगितले या मधूनच त्यांचा पराभव अधोरेखित झाल्याचे नमूद केले. मानसिंग पाटील यांनी आगामी २० नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे ,माता-भगिनीं सह असंघटित बांधकाम कामगार आणि समाजातील सर्व घटकांना राज्य आणि केंद्र सरकारने विविध योजनातून केलेली भरघोस मदत ही सर्वांपर्यंत पोचली पाहिजे असे आग्रहाने नमूद केले. लोकसभेच्या वेळेस खोटं सांगून – तसे नॅरेटिव्ह पसरून संविधान बदलणार – संविधान बदलणार एक भीती समाजात निर्माण केली त्यामुळेच यावेळी सर्वांनी दक्षतेने कार्यरत राहावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मानसिंग पाटील, राजू मोरे, अभिषेक बोंद्रे, विश्वराज महाडिक, संजय पाटील, संजय माने, विश्वास कळके, सचिन दिवसे , सुनील बोडके, श्रीकांत पोवार, रवींद्र पोवार, सत्यजित पाटील, सागर घाडगे, प्रशांत घोरपडे, सुरेश सुतार, तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील तरुण मंडळे व ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!