*विरोधकही अमल महाडिक यांना साथ देतात यातच त्यांचा विजय – सौ शौमिका महाडिक यांचे कणेरी सभेत प्रतिपादन*
कोल्हापूर –
गेली दहा वर्ष सातत्याने नियमित कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गावा गावातील घराघरांमध्ये आणि उपनगरातील प्रत्येक अपार्टमेंटमध्ये मधील नागरिकांशी आपली नाळ जुळवून संपर्कात असलेले आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय असलेल्या अमल महाडीक यांना त्यांचे विरोधक ही सन्मान देतात, यातच त्यांचा विजय सामावलेला आहे असे प्रतिपादन गोकुळ संचालिका सौ. शौमिका महाडीक यांनी केले. कणेरी येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेमध्ये ५ लाख विमा हा प्रत्येक कुटुंबासाठी मिळतो यासाठी अमल महाडिक यांनी हजारो कुटुंबीयांना त्याचा लाभ मिळवण्यासाठी ची सर्व यंत्रणा भाजपाच्या माध्यमातून राबवलीआहे, हे नमूद करून त्यांनी सांगितले की निव्वळ डिजिटल बॅनर लावून आणि त्यामध्ये हे केंद्र शासनाच्या विविध योजनांचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा महापराक्रम विद्यमान आमदारांनी केला आहे मात्र येत्या २० नोव्हेंबरला कमळा समोर चे बटन दाबून अमल महाडिक यांना तमाम मतदार हे प्रचंड मतांनी विजयी करतील हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
गेले दहा वर्षे सातत्याने कोल्हापूर दक्षिणच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या अमल महाडिक येत्या २० नोव्हेंबर प्रचंड मताने विजयी करावे आणि पुन्हा एकदा आमदार पदी बसवून अधिकार वाणीने सेवा करण्याची संधी द्यावी असेही आहवान त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद मनीषा वास्कर, माजी सैनिक श्रीधर पाटील, माजी सरपंच एमडी पाटील, सूर्यकांत पाटील (सरकार), संजय वास्कर, ग्रामपंचायत सदस्य उज्वला पाटील, कविता शिंदे, मेघा पाटील, रेश्मा पाटील, विजयाताई पाटील, मंगल माळी, आनंदराव माळी, जयसिंग पाटील, बाळासाहेब चव्हाण, धनाजी पाटील, राजू शिंदे, कणेरी वाडीचे माजी सरपंच पांडुरंग खोत, चंद्रकांत शिंदे, प्रमोद पाटील, अमित पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब धनवडे, गिरीश बूजरे, शशिकांत शिंदे, दत्ता मगदूम, सुनील पाटील, विल्सन मंतेरो, दिगंबर पाटील, संदीप धनवडे, अनिल स्वामी, युवराज पाटील, तानाजी धनवडे, नानासो नाईक, सुरेश कदम, निवास पाटील, इंद्रजीत पाटील, राकेश यादव, पी जी पाटील सर, यशवंत पाटील, संजय पाटील, महादेव माळी, एस पी पाटील, राजू शिंदे, प्रदीप पाटील, सुनील पाटील, बजरंग पाटील, श्रीकांत गुडाळे, ज्ञानेश्वर पाटील, संभाजी म्हाकवे, धनाजी पाटील, आबा शेळके, पांडुरंग खोत, चंद्रकांत चव्हाण, गणपती चिखलव्होळ यांच्यासह स्थानिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच कणेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.