कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले थकीत आहेत राज्य सरकारचे दिवाळे निघाले आहे का? साथी शिवाजीराव परूळेकर यांचा संतप्त सवाल समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन छेडणार

Spread the news

 

कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले थकीत

 

राज्य सरकारचे दिवाळे निघाले आहे का?

साथी शिवाजीराव परूळेकर यांचा संतप्त सवाल

 

समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन छेडणार

कोल्हापूर दि. 12 राज्य शासनाने लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सुमारे एक लाख कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास जलजीवन मिशन , जलसंधारण ,जलसिंचन इत्यादी खात्याची कामे काढली.  त्यासाठी निविदा प्रसिद्ध करून टेंडर काढून त्याची वर्कऑर्डर ही काढली. या कामासाठी जुने व नवोदित कंत्राटदारांनीही सुमारे दहा हजार कोटी रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले. मंजुरीनंतर काही कामे पूर्ण झाली. काही पूर्ततेच्या मार्गावर आहेत. पण कंत्राटदारांची बिले सरकारने दिली नसल्याने ते अडचणीत आले आहेत.

 

कामासाठी कंत्राटदारांचे सुमारे दहा हजार कोटी खर्च झाले . 19 हजार कोटी रुपये एक लाख कंत्राटदारांचे आडकून राहिले. पण मंत्री महोदय निवडणुकीतच गुंतून पडल्याने व तिजोरीवरील ताणामुळे या कंत्राटदारांना सात आठ महिन्यात दमडीही मिळाली नसल्याने गुंतवणूकदाराने ज्या बँकांकडून खाजगी सावकारांकडून कर्ज घेतली; त्यांचा तगादा लागला आहे. प्रपंच्या औषधोपचार ,मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न या सर्वांना आर्थिक ओढाताण झाल्याने कंत्राटदार उपासमार व मानसिक तणावामुळे आत्महत्येच्या मनःस्थितीत आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधी कंत्राटदार महासंघाने यापूर्वी जानेवारी 2024 पासून पाच ते सहा वेळा मंत्री महोदयांना भेटून निवेदने देऊनही उपयोग झाला नाही.
कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघाच्या महाराष्ट्र राज्य जलजीवन कंत्राटदार महासंघ यांनी यापूर्वी 7 जानेवारी 2024, 5 फेब्रुवारी रोजी, 5 फेब्रुवारी , 17 फेब्रुवारी , 20 मार्च व 17 एप्रिल 2024 ला निवेदने दिली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सोबत पाच मार्चला बैठक होऊन 14 एप्रिल पर्यंत थकित बिले अदा करण्याचे आश्वासन दिले होते. पण फाईल अर्थ सचिव व अर्थमंत्री यांच्याकडे (कामाच्या व्यापामुळे ) प्रलंबित असल्याचे समजते .
म्हणून सात मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. समाजवादी पार्टी या आंदोलनाला पाठिंबा देऊन तीव्र आंदोलन छेडेल व विधानसभा सभेत ही वाचा फोडेल .असे समाजवादी पार्टी महाप्रदेश जनरल सेक्रेटरी शिवाजीराव परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही ऑफ द रेकॉर्ड राज्यातील शेकडो कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. पण कंत्राटदारांची अवस्था सांगता येत नाही व सोसतही नाही अशी झाली आहे. त्यामुळे राज्यशासनाचे दिवाळे निघाले आहेत का ? असा संतप्त सवाल साथी शिवाजीराव परुळेकर यांनी केला आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!