सोशल सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी घडवले ‘गोवा’ दर्शन एआयएसएसएमएस एसएसपीएम डे स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोशल सायन्स प्रदर्शनाचे आयोजन

Spread the news

सोशल सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी घडवले ‘गोवा’ दर्शन
एआयएसएसएमएस एसएसपीएम डे स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोशल सायन्स प्रदर्शनाचे आयोजन

पुणे: एआयएसएसएमएस एसएसपीएम डे स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने ‘सोशल सायन्स प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात ५ वी ते १० वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेले ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक गोवा दर्शन.
प्राचार्या मिस शिवाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गोव्यातील प्रसिद्ध किल्ले, चर्च, मंदिरे, विधानसभा व नितांत सुंदर धबधबे यांचे मॉडेलच्या माध्यमातून स्थापत्य कला, इतिहास, भूगोल, संस्कृती इ. वैशिष्ट्यपूर्णरित्या दर्शवली. शिमगोत्सव, गोवा कार्निव्हल यांसारख्या पारंपरिक उत्सवांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. याशिवाय, साहित्य, विज्ञान, राजकारण व विविध क्षेत्रातील गोव्याच्या थोर व्यक्तिमत्त्वांची माहिती चित्रस्वरूपात दाखवण्यात आली. पारंपरिक चवदार खाद्यपदार्थांची चव उपस्थितांच्या जिभेवर रेंगाळली.
“विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेने गोव्याचे घडवलेल्या दर्शनाने प्रदर्शनाची शोभा द्विगुणित केली. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक आहे. सोबतच, शिक्षकांचे लाभलेले मार्गदर्शनही मोलाचे होते. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी संस्था कायमच विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे”, असे मत संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. प्रदर्शनाच्या निमित्ताने, एन. जी. इनामदार (जनरल मॅनेजर, वरिष्ठ कार्यकारी व मूल्यशिक्षण विभागप्रमुख, बिजनेस एथिक्स फाउंडेशन) व सी. कुलकर्णी (सदस्य, बिजनेस एथिक्स फाऊंडेशन) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या एकूणच गोव्याच्या प्रतिकृतीचे कौतुक केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!