स्मॅक’* च्या पुढाकाराने मालमत्ता कर कॅम्प चे यशस्वी आयोजन … * २ दिवसात ९६ उद्योजकांनी ₹. ५५,२३,३२५ इतकी रक्कम जमा केली.

Spread the news

स्मॅक’* च्या पुढाकाराने मालमत्ता कर कॅम्प चे यशस्वी आयोजन …
* २ दिवसात ९६ उद्योजकांनी ₹. ५५,२३,३२५ इतकी रक्कम जमा केली.
——————————————-
*शिरोली एमआयडीसी : २९ मार्च* : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर ‘स्मॅक’ च्या पुढाकाराने शिरोली औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता करा बाबतीतील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत शिये , टोप , एमआयडीसी व उद्योजकांची दिनांक २६ मार्च रोजी स्मॅक भवन मध्ये बैठक करण्यात आली.

­

 


  •  

स्मॅक चे चेअरमन राजू पाटील , व्हाईस चेअरमन भरत जाधव , ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे , खजानिस बदाम पाटील , संचालक अतुल पाटील , जयदीप चौगले , निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील , अजिंक्य तळेकर , भीमराव खाडे , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग कोल्हापूर चे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक त्यांच्या प्रयत्नातून ही बैठक आयोजित केली गेली.

सन २०२०-२१ पासून मालमत्ता कर एमआयडीसी कडे द्यायचा शासन निर्णय आहे , पण ग्रामपंचायती किंवा उद्योजक यांच्यात दरासंबंधी काही अडी अडचणी असल्याने पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता.

ग्रामपंचायती , एमआयडीसी व उद्योजक यांच्यामध्ये झालेल्या
बैठकीमध्ये चर्चेअंती मागील सन २०२१ नंतरचे दंड व व्याज माफ करणे , सन २०१९ पूर्वीच्या थकबाकीदारांचे मागील दंड व्याज देखील माफ करायचे ठरले. तसेच देयक भरल्यानंतर उद्योजकांना पावती , एनओसी व असेसमेंट देण्याचे ठरले.

सन २०२०-२१ पासून आकारणीची देयक वेळेवर प्राप्त न झाल्याने उद्योजकांनी देयके भरली नाहीत. त्यामुळे याच्यावरील दंड व्याज माफ करायचं ग्रामपंचायतीनी मान्य केले.

एमआयडीसी मध्ये बहुतांश शेड इमारती असतात त्या अनुषंगाने रेडी रेकनर प्रमाणे आरसीसी इमारतीच्या ७५ टक्के दर लावून आकारणी होणे आवश्यक आहे आणि ही बाब सुद्धा सन २०२५-२६ पासून याप्रमाणे आकारणी करत असल्याच ग्रामपंचायतिनी मान्य केले.

बैठकीमध्ये शुक्रवार दिनांक २८ व शनिवार दिनांक २९ रोजी स्मॅक भवन मध्ये दोन दिवस कॅम्प आयोजित करून शिरोली [पु] , शिये , टोप व एमआयडीसीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ज्या ज्या उद्योजकांनी अजून बिले भरली नाहीत , ज्यांना बिले भरण्यामध्ये अडचणी आहेत यांच्यासाठी कॅम्प आयोजित करून मालमत्ता कर संपूर्ण पणे वसूल कसा होईल आणि त्याच्यातील समस्या निरांकर करून वसुली कसा होईल हे पाहण्याचे ठरले.

त्या अनुषंगाने दिनांक २८ मार्च रोजी मालमत्ता कर कॅम्प मध्ये ९६ कारखानदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन आकारणीची माहिती घेऊन शंकेचे निरसन केले , यातील ३१ कारखानदारांनी चेक ने व ९ कारखानदारांनी ऑनलाइनच्या माध्यमातून ₹. १९,३०,९६२ इतकी रक्कम जमा केली.

तसेच दिनांक २९ मार्च रोजी मालमत्ता कर कॅम्पमध्ये ७५ कारखानदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन आकारणीची माहिती घेऊन शंकेचे निरसन केले , यातील ४२ कारखानदारांनी चेक ने व १४ कारखानदारांनी ऑनलाइनच्या माध्यमातून ₹. ३५,९२,३६३ इतकी रक्कम जमा केली.

दोन दिवसीय मालमत्ता कर कॅम्प मध्ये एकूण ९६ कारखानदारांनी ₹. ५५,२३,३२५ इतकी रक्कम चेक व ऑनलाइनच्या माध्यमातून जमा केली.

एमआयडीसीच्या पोर्टलवर प्रॉब्लेम आल्यामुळे बरेच उद्योजक पोर्टल सुविधा सुरू झाल्यानंतर उद्या पैसे जमा करतील.

बैठकीमध्ये सन २०२५-२६ बाबत करा आकारणी ही रेडी रेकनरच्या ७५ टक्के दराप्रमाणे करणे , शिरोली [पु] , शिये , टोप नागाव या ग्रामपंचायतीचा कर आकारणी दर ₹. १.२० पैसे इतका समान असावा , कचरा उचलण्यासाठी नियमित गाडी पाठवणे , सन २०२५-२६ कर आकारणी करताना ग्रामपंचायतीचा असेसमेंट उतारा सोबत असावा , ग्रामपंचायती हद्दीतील एमआयडीसीचे मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते शक्य तितके लवकर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे , हनुमान नगर शिये – बावडा रोड करण्यासाठी ग्रामपंचायत व एमआयडीसी स्तरावर झालेल्या पत्र व्यवहाराच्या संबंधित पाठपुरावा करणे या मागण्या करण्यात आल्या.

बैठकीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कचरा उचलणे बाबत सुद्धा चर्चा झाली.

मालमत्ता कर कॅम्प हा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल उद्योजकांनी तसेच एमआयडीसी , तिन्ही ग्रामपंचायतींनी स्मॅक चे पदाधिकारी व संचालकांचे आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!