स्मॅक’ चेअरमनपदी राजू पाटील, व्हाईस चेअरमनपदी भरत जाधव आणि सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्षपदी सुरेन्द्र जैन*

Spread the news

📰 *’स्मॅक’ चेअरमनपदी राजू पाटील, व्हाईस चेअरमनपदी भरत जाधव आणि सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्षपदी सुरेन्द्र जैन*
—————————
*कोल्हापूर : १४ :* शिरोली येथील शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या [ स्मॅक ] चेअरमनपदी आर. एन. डी. इंडस्ट्रीजचे राजू तुकाराम पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी सरोज ग्रुपचे भरत परशुराम जाधव यांची निवड करण्यात आली.

ट्रेझररपदी शुभम टर्निंग सेंटरचे बदाम लक्ष्मण पाटील यांची फेरनिवड व ऑ. सेक्रेटरीपदी मिनर्व्हा एंटरप्राईजेसचे शेखर श्रीकांत कुसाळे यांची निवड करण्यात आली.

‘स्मॅक’ ही पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.

शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या ‘स्मॅक’ या संस्थेच्या संचालक मंडळाची १२ वी मासिक सभा गुरुवार दिनांक १४ रोजी मावळते चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या सभेमध्ये सन २०२४-२५ च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

तर ‘स्मॅक’ आयटीआय उषा एंटरप्राईजेसचे प्रशांत शिवाजीराव शेळके यांची फेरनिवड निवड करण्यात आली.

‘स्मॅक’ फौंड्री क्लस्टरच्या चेअरमनपदी चौगुले इंडस्ट्रीजचे सुरेश लक्ष्मण चौगुले यांची निवड करण्यात आली.

स्मॅक सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्षपदी ग्नेंट फौंड्रीचे सुरेन्द्र सोहनमल जैन यांची निवड करण्यात आली.

नूतन चेअरमन राजू तुकाराम पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

सुरेन्द्र सोहनमल जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ‘स्मॅक’ चे संचालक नीरज नरेन्द्र झंवर ,अतुल आनंदराव पाटील, रणजित चंद्रकांत जाधव , सुमंत दीपक पाटील आदी उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

जयदीप जयसिंगराव चौगले यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!