केआयटीकडे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवान विद्यार्थ्यांचा ओढा. सर्वच शाखांच्या या वर्षीच्या कट ऑफ मध्ये लक्षणीय वाढ.

Spread the news

केआयटीकडे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवान विद्यार्थ्यांचा ओढा.
सर्वच शाखांच्या या वर्षीच्या कट ऑफ मध्ये लक्षणीय वाढ.

कोल्हापूर

 

येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी राज्यभरातून अनेक गुणवान विद्यार्थ्यांचा प्रथम पसंतीचा ओढा दिसून येत आहे. राज्यभरातील उत्तम पर्सेंटाइल असणारे अनेक विद्यार्थ्यांनी केआयटी ची निवड केली आहे. मेकॅनिकल, सिव्हील, सिव्हील अँड एन्व्हार्नमेंट, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या मूळ शाखां कडे अधिक पर्सेंटाइल असणारा विद्यार्थी वळताना दिसून येत आहे.केआयटीने वरील मूळ शाखांमधील कोणत्याही एका शाखेची एकूण विद्यार्थी संख्या न घटवल्यामुळे केआयटी ला वरील चार विभागांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. अधिक पर्सेंटाइल चे विद्यार्थी केआयटी ला प्रवेश घेत असल्यामुळे केआयटी च्या दर्जात्मक शिक्षणा वर पुन्हा एकदा शिक्का मुहूर्त स्वतः विद्यार्थ्यांनीच केलेले आहे असे मत संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या सर्व भागातून विद्यार्थ्यांनी केआयटीच्या सर्वच विभागांना प्रथम प्राधान्य क्रमांक दिल्यामुळे शहरी, ग्रामीण, निमशहरी विद्यार्थी या व अशा अनेक गुणवान विद्यार्थ्यांचे प्रवेश केआयटीमध्ये आगामी काळातही होतील अशा प्रकारची अपेक्षाही संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री साजिद हुदली यांनी व्यक्त केली.प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी केआयटी परिवारातर्फे स्वागत व अभिनंदन केले.

फोटो तपशील- केआयटीत प्रथम प्रवेश घेतलेल्या सिद्धी मांडवकर, आनंद वराडे या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार सोबत विद्यार्थ्यांचे पालक व प्राध्यापक.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!